Hindi, asked by Aafreengujar786, 1 month ago

भेटीलागीं जीवा लागलीसे आस
। पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।
तैसें माझें मन वाट पाहे ॥२॥
भुकेलिवा बाळ अति शोक करी ।
वाट पाहे उरि माउलीची ॥४॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धांवूनि श्रीमुख दांवी देवा ॥५॥

दिवाळीच्या मुळा लेंकीं आसावली
। पाहातसे वाटुली पंढरीची ||३||

this is the poem with the help of the poem answer this question


(अ) संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.

(आ) चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.

these 2 questions please answer

it takes too time for writing this question please answer right ​

Answers

Answered by RiyaArmyy7777
0

Answer:

(अ) संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.

उत्तर :

संत तुकारामांनी या अभंगात दिलेले लहान बाळाचे उदाहरण मला खूप आवडते. ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्‍व हे त्याची आईच असते त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्‍व म्हणजे फक्त विठ्ठलच आहे. बाळाला भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहतो. तिची भेट होणे हे त्याचे ध्येय असते. त्याचप्रमाणे विठ्ठलाची भेट हे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय आहे.

(आ) चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते. पौर्णिमेच्या चंद्राची तो आतुरतेने वाट पाहत असतो. त्याचप्रमाणे पंढरपुरच्या विठ्ठलाच्या भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे. विठ्ठलाचे दर्शन हेच जणू त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.

Explanation:

I hope it helps you!!

plz mark!!

Attachments:
Similar questions