India Languages, asked by khanyasmin0808, 5 months ago

चित्रकले स्पर्धेत मित्राला / मैत्रिणीला प्रथम पारितोषिक
मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे पत्र.​

Answers

Answered by rasheedmdrawaha76
0

Answer:

First prize to a friend in painting competition

Congratulatory letter for receiving.

Answered by pawdesanika
1

Answer:

दिनांक 4/4/2022

प्रति,

राहुल म्हात्रे,

सरस्वती विद्यालय,

मोती नगर,

पुणे.

प्रिय राहुल,

स. नमस्कार,

राहुल तुझे मनापासून अभिनंदन आज वर्तमानपत्रामध्ये तुझा फोटो पाहिला आणि मन आनंदित झाले. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तू राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. तुला मिळालेले हे यश खरच खूप कौतुकास्पद आहे. तुझ्या कठोर परिश्रमाचे हे फळ आहे. तुझ्या यशाची बातमी मी माझ्या आई बाबांना दिली आहे, त्यांनी ही तुझं खूप कौतुक केलं आहे आणि तुला त्यांनी भावी यशासाठी अनेक आशीर्वाद दिले आहेत, अशीच तुझ्या शालेय जीवनात उत्तम कामगिरी करत जा. तुझ्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा.

कळावे,

तुझा मित्र

राधे

Similar questions