छापत्र लेखन
गशाळ्या पाण्याचा कांदआइत्यामुळे तक्रार करणारे पत्र
मन्याध्यापकांना लिहा
Answers
Answer:
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडकोतील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने आता एमआयडीसीसमोर पदर पसरला असून, पत्र पाठवून पाच एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) पाणी देण्याची याचना केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिडको - हडकोचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. सिडको एन ५ येथील जलकुंभातून सिडको - हडकोसह मुकुंदवाडी - चिकलठाणा पर्यंतच्या वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. या परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी २८ एमएलडी पाण्याची गरज आहे, परंतु आवश्यकतेपेक्षा आठ ते दहा एमएलडी पाणी कमी मिळते. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाल्याच्या तक्रारी आहेत. अवेळी व अपुरा पाणीपुरवठा होतो, अशी या भागातील नागरिकांची व नगरसेवकांची तक्रार आहे. त्यासाठी नगरसेवकांनी पंधरा दिवसांत दोन वेळा सिडको एन ५ येथील जलकुंभावर जावून आंदोलन केले. सोमवारी नगरसेवकांनी केलेले आंदोलन अधिक आक्रमक होते. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. एमआयडीसीची स्वतंत्र जलवाहिनी आहे आणि जास्तीचे पाणी देखील उपलब्ध आहे. त्यामुळे पाच एमएलडी पाणी सिडको एन ५च्या जलकुंभासाठी द्यावे अशी विनंती करणारे पत्र जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले आहे.
\Bपुढील आठवड्यात निर्णय
\Bआयुक्तांनी पाठविलेल्या पत्रावर आगामी आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. एमआयडीसीने पाणी दिल्यास सिडकोतील पाण्याचा प्रश्न बहुतांश प्रमाणात निकाली निघू शकेल. तीन दिवसांआड पाणीपुरवठा आता होणार असल्यामुळे उपलब्ध होणारे पाणी पुरेसे असेल, असा दावा केला जात आहे. सिडकोसाठी जास्तीचे पाणी मिळावे यासाठी महापौर नंदकुमार घोडेले देखील एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहेत