छत्रपती शिवाजी महाराज याचें तलवार कुठे आहे
Answers
Answer:
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला भवानी तलवार म्हणतात. ही तलवार श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या भवानी माता देवीने दिली असे सांगतात. इतिहासात असे वाचायला मिळते की, शिवाजी महाराज कोकण दौऱ्यावर असताना ते सप्तकोटेश्वर मंदिरात गेले असता, त्यांची भेट अंबाजी सावंत यांच्याशी झाली. महाराजांची भेट झाली या आनंदात अंबाजी सावंत यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना एका पोर्तुगीज जहाज लुटीत सापडलेली रत्नजडित तलवार भेट म्हणून दिली. ही तलवार शिवाजी महाराजांना फारच आवडली, पुढे शिवाजी महाराजांनी तिला भवानी तलवार असे नाव दिले.तिचे वजन हे फक्त 1200 ग्रॅम होते.
भवानी तलवार कशी होती? संपादन करा
भवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहीत नाही. इतिहासकार ग.ह. खरे सांगत, ""भवानी तलवारीचे प्रमाणभूत वर्णन आजही उपलब्ध नाही. परमानंदाच्या शिवभारतात आणि हरि कवीच्या शंभुराजचरित्रात हिचा उल्लेख आला असला, तरी त्यात हिची लांबी, रुंदी, धार, मूठ, पाते, पोलाद, तीवरील चिन्हे, जडाव वगैरेचे काम इत्यादी तपशील दिलेला नाही. शिवाय परंपरागत अशीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून आज एखाद्याने एखादी तलवार पुढे आणून ती "भवानी' असल्याचे सांगितले, तर तज्ज्ञ त्याच्या शब्दास कधीच मान्यता देणार नाहीत. या तलवारीची प्रतिकृती आता उपलब्ध आहे.
Explanation:
It's not found dear