History, asked by amit62, 1 year ago

essay on aarsa Nasta tar

Answers

Answered by Anonymous
47
"आरसा नसता तर..."

आजच्या सुधारलेल्या जगात आरशाशिवाय बिलकुल चालायचे नाही. एक वेळ जेवण नसले तरी चालेल; पण आरसा समोर पाहिजे. मी आरशासमोर बराच वेळ उभा होतो. आरसा नसता तर.. किंवा हा अारसा कसा निर्माण झाला? असे विचार माझ्या मनात एकसारखे येत होते. या विचारात मी कधी झोपी गेलाे, हे सुद्धा कळले नाही.

थोड्याच वेळात आरसा माझ्यासमोर बोलू लागला -

"मी जर नसतो तर स्वतःची ओळख माणसाला पटली नसती. माणसाला स्वतःचे रूपरंग पाहता आले नसते."

"मी कसा निर्माण झालो हे माझे मलाच आठवत नाही. माझे पूर्वज रामायण काळापासून आहेत. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांचा जन्म इटली देशात झाला असे म्हणतात. आता जगभर आमचा प्रसार झाला आहे. आमच्याशिवाय तुमचा चेहरा कसा आहे तुम्हांला कसे कळणार ?"

"आम्ही तुमची नेहमीच स्तुती करतो. तुम्ही कुरूप असलात तरी आम्ही सांगतो की, तू छबीपेक्षा किती तरी चांगला आहेस! तसेच सुंदर असाल तर आम्ही म्हणतो, वा! वा!! तुझ्यासारखा रूपवान तूच! आणि याचमुळे आम्ही आरसे तुम्हा सर्वांना प्रिय! म्हणूनच तुम्ही इतरांपेक्षा आम्हांला फार जपता. सुंदर चौकटीत बसवता, कोणाचा धक्का न लागेल अशा ठिकाणी ठेवता. यामुळे आम्ही सुरक्षित आहोत."

"तुझे मन असेच माझ्यासारखे स्वच्छ ठेव आणि तू सुद्धा गुणवान हो!"

असे म्हणून अारसा बोलायचा थांबला.
Similar questions