Essay on flood in marathi- पुरावर निबंध लिहा
Answers
केरळमध्ये पुरामुळे हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. भारतातून तर येथे मदतीचा ओघ सुरूच आहे, पण युएई, थायलंड, मालदीवसारख्या देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी मदत करू इच्छिणाऱ्या देशांचे तत्काळ आभारही मानले. पण केंद्र सरकारच्या धोरणानुसार, नैसर्गिक आपत्तीसाठी कोणत्याही देशाकडून मदत स्वीकारली जाणार नाही. परिणामी केरळला मदत हवी असूनही केंद्रामुळे ती मिळणार नाही, अशी स्थिती आहे.
पावसाचा अतिरेक किंवा एखाद्या धरणातील पाणी पूर्व सूचना न देता सोडण्याचा परिणाम पुरात होतो. पूर हे असे दैत्य आहे जे आपल्या सोबत आणि आपल्या नंतर हि फक्त विनाशाची चिन्हे सोडते. कित्येक लोक, कित्येक मालमत्ता अनेक पशुपक्षी ह्या पुरामध्ये जलमग्न होतात. भारताने अनेकदा पुराचे तांडव बघितले आहे. १९४३ मध्ये मद्रासला आल्येला महापूराची आठवण आताही मनात भीती निर्माण करते. १९८७ वर्षी कोशी नदीमध्ये उफान आल्यामुळे झाल्येल्या प्रलयाला आजही बिहार विसरला नसेल.
ह्यावर्षी केरळ मध्ये आलेला पूर आजपर्यंतचा पुरापेक्षा जास्त विनाशकारी होता. ह्या एकट्या पुराणे केरळ राज्याचे १४ जिल्हे नेस्तनाबूत केले. ४४५ मृत्यू आणि सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा नुकसान असा विक्रमी विनाश यंदाचा पुराणे केला. पावसाचा पाऊस जेव्हा धोक्याचा चिन्हाचा वरती वाहू लागतो आणि सरकारी यंत्रणा ह्या पुरापासून सावध राहण्याची घोषणा करते, त्या वेळेस एखाद्या सुखरूप स्थानी हलून जाणे बर असते.