Hindi, asked by sonu8321, 7 months ago

essay on hard work in Marathi if possible​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

महत्वाचे मुद्दे :वेद कालीन गुरुकुलांमधील श्रमसाधना, आंग्लविभूषित वर्गावर श्रमांचे संस्कार नाहीत, शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी श्रम आवश्यक, शहरवासीयांच्या श्रमा-विषयी चुकीच्या कल्पना, कठोर परीश्रमास पर्याय नाही ‘.

” पिके श्रमांत श्रीमंती, श्रम माणसाच्या हाती “.(Pike shramat shrimanti, Shram Mansachya Hathi)…… ‘श्रम ‘ हा ऐहिक सुखाचा मूलमंत्र आहे. वेद काळात श्रमाचे महत्व सर्व मान्य होते. व्रतबंधन झाल्यावर बटूला ब्रम्ह्चर्याश्रमात विद्या मिळविण्यासाठी ऋषींच्या आश्रमात शिक्षण संपेपर्यंत राहावे लागे येथे विद्याग्रहणाबरोबरच गुरुपत्नीच्या घर कामात मदत करावी लागे. जंगलातून लाकडे तोडून आणणे, फुले व समिधा गोळा करणे, पाणी भरणे इ. कामेविद्यार्थी करीत. त्यामुळे वेगळे श्रम संस्कार करावे लागत नसे, श्रीमंत-गरीब हा भेदभाव तेथे नसे त्यामुळे श्रीमंताच्या मुलांनाही श्रमाचे महत्व कळत असे व शारीरिक श्रमांना आपोआपच प्रतिष्ठा प्राप्त होत असे. मोकळ्या हवेत श्रम केल्याने आरोग्यही चांगले राही.

* भारतात ब्रीटीशांचे राज्य सुरु झाल्या नंतर, देशात आंग्लविद्याविभूषित असा वर्ग तयार झाला. सुशिक्षित वर्ग ब्रीटीशांच्या सेवेत होता. बुदधिजीवी वर्गात यांची गणना होऊ लागली. श्रमाचे काम करण्याची यांची सवय तुटली आणि एक पांढरपेशा वर्ग तयार झाला. ब्रिटीश अधिकारी अशा सुशिक्षितांना मानाने वागवत. त्यामुळे बुदधिजिवींना अधिक प्रतिष्ठा मिळाली; वेगळा श्रमिकवर्ग तयार झाला. त्याला अर्थातच कमी दर्जा प्राप्त झाला. दोघांच्या वेतन मानातहि फरक पडू लागला. शारीरिक कष्ट करणार्याच्या श्रमांचे मुल्य कमी लेखले जाऊ लागले. महात्मा गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट साने गुरुजींसारख्या उच्चपदवी विभूषित, मानवतेच्या महान सेवकांनी कोणतेही काम हलके नाही हे तत्व, स्वत:सर्व शारीरिक श्रमाची कामे करवून पटवून दिले. व जनतेला श्रम संस्काराचे उदाहरण घालून दिले.

* श्रमप्रतिष्ठा वाढविण्यासाठी मुदलियार, कोठारी, गजेंद्र गडकर यांसारख्या शिक्षण आयोगांनी शिक्षणक्रमात समाजसेवा कार्यानुभव यांसारखे (अंगमेहनतीचे) विषय अंतर्भूत करून शालेय पातळीपासून विद्यार्थ्यासाठी श्रमाचे महत्व बिंबवले.

* दैनदिन जीवनात सुद्धा श्रमाचे फार महत्व आहे. बैठे काम करणारी मंडळी प्रकृती उत्तम राहावी म्हणून शरीराला श्रम आवश्यक आहे हे लक्षात घेऊन रोज सकाळी धावणे, भरभर चालणे, योगासने करणे ई. प्रकारांतून शरीर सुदृढ व निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. ज्यांच्या घरा समोरछोट्या बागा आहेत अशी माणसे बागकाम करतात.भरपूर घाम निघाला की शरीर स्वास्थ्य चांगले राहाते.

* काहींची अशी कल्पना असते की नोकरीवर जाताना गाडी पकडण्यासाठी केलेली धावपळ किंवा तासभर उभ्याने केलेला प्रवास हे श्रम आपोआपच घडतात म्हणून ईतर श्रम आवश्यक नाही. केवळ लोकलसाठी धावल्याने किंवा गाडीसाठी उभे राहिल्याने शरीराला श्रम होत नाही. तर तो काही प्रमाणात शरीरावर पडलेला ताण असतो. या ताणामुळे थकायला होते. तीच गोष्ट घरातील कामा संबंधी असते. अनेक यांत्रिक उपकरणे, उभ्याचा ओटा, जेवणाचे टेबल, या सर्व सोयीमुळे पूर्वीप्रमाणे दळण-कांडण, विहिरीचे पाणी काढणे, ओणव्याने वाढणे, इत्यादी कामांमुळे मिळणारा व्यायाम हल्लीच्या स्त्रियांना मिळत नाही. त्यामुळे पोटाचे, सांध्याचे, व लठ्ठपणाचे अनेक प्रकार वाढत्या प्रमाणात आढळतात.

I HOPE IT HELP YOU.....

Answered by pnselvakumari
1

Answer:

Mark me as Brainliest

FOLLOW ME

Attachments:
Similar questions