essay on माझ्या आवडत्या शिक्षीका
Answers
पहिला शिक्षक अर्थातच माझी “आई”.
पण त्यानंतर मला आजवर जे शिक्षक(गुरू) लाभले…खरंच आज जर ते माझ्या शैक्षणिक प्रवासाचा भाग नसते तर मी खूप गोष्टींपासून मुकले असते. त्यातल्याच माझ्या काही आवडत्या शिक्षकांविषयी सांगायचंच झाल तर माझ्या बालवाडी ते चौथी पर्यंतच्या वर्गशिक्षिका “पवार” बाई,माझ्या खूप खूप FAVOURITE TEACHER…ते दिवस आठवले कि अगदी आजवर त्यांचा एक एक शब्द मला आठवतो ( मी त्यांची लाडकी विद्यार्थीनी होते ) प्रेमळ,मायाळू,अगदी माझी दुसरी आईच म्हणेन मी…
नंतर माझे पाचवी ते आठवी चे वर्गशिक्षक “भागीत” सर…स्वभावाला खूप कडक,गणित विषय असल्याने अजूनच भीत भीत मी त्यांच्या समोर जायचे…प्रत्येक पद्धतिने मी मार खाल्ला असावा त्यांचा, पण तरी का कोण जाणे मला ते सर खूप आवडायचे.
त्यानंतर नववीच्या वर्गशिक्षिका “वनिता कुलकर्णी” मॅडम अगदी “पवार” बाईंसारख्या…त्यांना भेटून मला माझ अगदी लहानपणच आठवायचं…त्यांचा मला नेहमीच पाठिंबा असायचा माझे शाळे संदर्भातले सगळे हट्ट ह्या शिक्षिकेने पुणें केले होते म्हणूनच माझ्या teachers favorite list मध्ये ह्याचही नाव येत.
मग माझ्या नावडत्या विषयाला आजवर आवडता विषयावर टिकवून ठेवणारे “योगेश बिचकर” सर…अर्थात थोडे चीड चीड करणारे, तितकेच JOLLY, FORMULA चुकल्यावर क्लास बाहेर चंद्र बघायला पाठवणारे, मला आठवत मी सतत हसायचे( जे आजही कायम आहे )म्हणून माझ्या मित्रांना माझ्या तोंडात रुमाल कोंबायला सांगणारे असे आमचे सर ज्यांचा माझ्या शैक्षणिक वाटचालीतला भाग नक्कीच महत्वाचा होता…आज त्यांनी मला गणित विषय शिकवला नसता तर बहुतेक मी सुद्धा इतरांसारखच गणिताला बघून तोंड वाकडं केल असत.
आणि त्यानंतर FY ते TYBMM माझा रूईयातला महत्वाचा काळ…आणि इथे “कौस्तुभ जोशी” सर ज्यांना आम्ही प्रेमाने (केजो सर)असही म्हणतो…सर तुमच्या सारखा शिक्षक खरच नशीबवान विद्यार्थ्यांनाच लाभतो, तुमची शिकवणी आणि मार्गदर्शन मी आयुष्यभर लक्षात ठेवीन मुळात ठेवीन नाही तर ते मी विसरुच शकणार नाही…
असे हे माझे काही निवडक आणि आवडते शिक्षक ज्यांच्या शिवाय माझ्या प्रगती-पुस्तकातली प्रगती नेहमीच अपूर्ण राहिली असती…
आशा आहे की हे मदत करेल✌
कृपया मला BRAINLIEST☀ म्हणून चिन्हांकित करा..☺
धन्यवाद...