India Languages, asked by bajpaiatharva264, 11 months ago

essay on maza avadta sant 450 words in marathi

Answers

Answered by halamadrid
10

■■माझा आवडता संत■■

लहानपणी आपण संतांच्या बऱ्याच गोष्टी आपल्या आई बाबांकडून,शिक्षकांकडून ऐकत असतो.त्यांच्या गोष्टी ऐकल्यावर आपल्याला प्रेरणा मिळते,आपल्यावर चांगले संस्कार होतात.

आपल्या भारत देशाला थोर संत लाभले आहेत.तसे तर मला सगळ्याच संतांच्या गोष्टी ऐकायला फार आवडते.पण संत तुकाराम हे माझे आवडते संत आहेत.

संत तुकाराम स्वभावाने खूप चांगले होते.ते खूप प्रेमळ होते.त्यांना कोणत्याही गोष्टीचा गर्व नव्हता.ते कोणाचा द्वेष करत नसत.

आईने मला सांगितलेले संत तुकारामांचा एक प्रसंग मला अजून ही आठवतो.एकदा संत तुकाराम घरी येत होते.त्यांनी आपल्या मुलांसाठी ऊस घेतला होता.पण वाटेत त्यांना इतर मुले भेटली. त्यांनी त्यांच्याकडून ऊस मागितला.तुकाराम महाराजांनी त्यांना पूर्ण ऊस आनंदाने दिला.ते असे परोपकारी होते.

तुकाराम महाराज विठ्ठलाचे भजन करत असत.ते कीर्तन करायचे.त्यांनी खूप अभंग लिहिले.आपल्या कीर्तनातून व अभंगांतून ते लोकांना उपदेश करत असत.त्यांचे अभंग अजूनही आपल्याला स्फूर्ती देतात.

Similar questions