Essay on security of women is responsibility of society in Marathi
Answers
wownekepd
ifhfld9
ckvvkfo
ffgggdn
rndkeoifmftk
■■ महिलांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी■■
आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे.पुरुषांसारखेच किंवा पुरुषांपेक्षा जास्त यश आज स्त्री प्रत्येक कामात मिळवत आहे.
इतकी प्रसिद्धि आणि प्रतिष्ठा मिळवूनसुद्धा महिलांसोबत बरेच गुन्हे होत आहेत.या गुह्यांसंबंधित बातम्या ऐकून आपले मन खूप दुखी होते.
तेव्हा,महिलांची सुरक्षा हा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे आणि महिलांची सुरक्षा हे समाजाचे कर्तव्य आहे.महिलांना सुरक्षिततेचे वातावरण उपलब्ध करून देणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.
समाजातील प्रत्येकाने महिलांसाठी समाजात असे वातावरण निर्माण केले पाहिजे,जिथे त्यांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा राखली जाईल.समाजात प्रत्येकाने महिलांचे आदर केले पाहिजे आणि त्यांना प्रतिष्ठित जीवन जगता यावे म्हणून प्रयत्न केले पाहिजे.
ही आपल्या समाजाची जबाबदारी आहे की महिलांना समान संधी मिळाव्यात आणि त्यांचे सबलीकरण व्हावे.समाजाने महिलांना देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.
महिलांचा आपल्या समाजाच्या भल्यासाठी महत्वपूर्ण योगदान आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी समाजाची आहे.