India Languages, asked by stylemylo4062, 8 months ago

essay on swachata in marathi

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

माझी आजी नेहमी सांगत असे की, 'हात फिरे, तेथे लक्ष्मी वसे.' केवढा मोठा अर्थ आहे या शब्दांत! आपण स्वच्छता ठेवली की, वैभव आपोआपच चालत येते. पण आपण हे कधीच लक्षात घेत नाही. आपले वर्तन सुधारत नाही.

वैयक्तिक स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. नीट आंघोळ केली नाही, तर त्वचारोग होतील. तोंडाची स्वच्छता ठेवली नाही, तर दात किडतील. केसांची स्वच्छता राखली नाही, तर केसांत उवा होतील.

व्यक्तिगत स्वच्छतेइतकीच घराची, गावाची, देशाचीही स्वच्छता आवश्यक आहे. प्रत्येक गावात शौचालये हवीत. तरच गावात स्वच्छता राहील. गावातील लोक नदी-तलावाचे पाणी खराब करतात. भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरांची स्वच्छता ही सर्व कामे लोक नदीत करतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य ठरते. त्या पाण्यामुळे रोगराई पसरते. म्‍हणुन ही नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले पाहीजे.

आपण सर्वांनी आपल्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेत तर असतोच पण आपण जेव्‍हा आपल्‍या परीसराची काळजी घेऊ तेव्हाच आपल्या देशात स्वच्छता होईल कारण प्रत्येक व्यक्ती परीसराच्‍या स्वच्छता करत असेल तरच आपला देश स्वच्छ होईल . घरात स्‍वच्‍छता राखण्‍याचे फायदे पण भरपुर आहेत,घरात स्वच्छता ठेवल्‍याने आपण आजारी पडणार नाही. मनही प्रसन्न राहील

जर आपण घरात अस्‍वच्‍छता ठेवली तर अनेक प्रकारचे किटक जसे झुरळ, डास आपल्‍या घरात शिरून रोगराई पसरविण्‍याचे काम करतात. व परीणामी आपण आजारी पडतो त्‍यात आपले पैसे व वेळ दोन्‍ही वाया जातात. घरात स्‍वच्‍छता असली व घरात एखादा पाहुणा आल्‍यास तो घरातील स्‍वच्‍छता पाहुन खुप खुष होतो. पण जर का घराता स्‍वच्‍छता नसेल तर ती अस्‍वच्‍छता कोणालाच आवडणार नाही. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या परीसर स्वच्छ करणे. स्वच्छता हा मानवाचा आवश्यक गुण आहे. विविध प्रकारचे आजार रोखण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत असा विश्वास आहे की जिथे तेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मी निवास करते.

Explanation:

hope this helps you

plz...mark as brainliest

Similar questions