ग्रंथ हेच गुरु या विषयावर निबंध लिहा
Answers
'ग्रंथ हेच खरे गुरु होय.' ग्रंथ हे आपल्या आयुष्यभराच्या ज्ञानाची, आत्मज्ञानाची कल्पकतेची शिदोरी असते. ग्रंथ हे निरंतर ज्ञान देण्याचे कार्य करतात. सतत ग्रंथ वाचल्याने आपल्या बुद्धीची कार्यक्षमता वाढते, आकलनक्षमता वाढते, विचारकरण्याची शक्ती मिळते. खरंच आई व गुरूंसारखे आपल्याला ज्ञानदानाचे कार्य हे ग्रंथ करतात. ग्रंथवाचनाने आपल्याला संभाषण कला, वक्तृत्वकला, आत्मविश्वास, अनुभव, लेखनकौशल्य इत्यादी गुणांचा विकास होतो. खरा मित्राची महती, सुखदुःखातिल सोबती, म्हणजेच ग्रंथ होय. ग्रंथ हेच खरे गुरू व मार्गदर्शक होय. अज्ञानाचा अंधार नाहीसा करून ज्ञानरूपी प्रकाश दाखविणारा सूर्य म्हणजेच ग्रंथ होय.
■■ग्रंथ हेच गुरु■■
ग्रंथ, एका गुरूसारखे आपले योग्य मार्गदर्शन करतात. ग्रंथ आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात, आपल्यावर चांगले संस्कार करतात.
एखाद्या समस्यात अडकल्यास, एका गुरूसारखे, ग्रंथ आपल्याला समस्येतून निघायला मदत करतात. ग्रंथ वाचल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, आपण स्वतःवर विश्वास करण्यास शिकतो.
एका गुरूसारखेच, ग्रंथ सुद्धा आपल्याला धर्माचे महत्व, काय योग्य आहे आणि काय अयोग्य, हे सांगतात. ग्रंथ वाचून आपले मन शांत होते, आपली मनःस्थिति बदलते,आपले विचार सकारात्मक होतात.
ग्रंथ वाचल्यामुळे आपली विचार करण्याची शक्ती वाढते, आपला शब्दसंग्रह वाढतो, आपली कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढते.
अशा प्रकारे, ग्रंथ खूप महत्वपूर्ण असतात आणि म्हणून त्यांना गुरुसारखेच सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. खरंच, 'ग्रंथ आपले गुरु' आहेत.