Hindi, asked by manideepR9520, 1 year ago

Ghadyal nasta tar marathi

Answers

Answered by asmi1524
51
घड्याळ नसते तर.. कल्पनाच करवत नाही.  खरंच घड्याळ नसेल तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळेचे सर्वच गणित चुकेल. घड्याळ नाही तर उठायचे कधी, शाळेत जायचे-यायचे कधी हे काहीच समजणारच नाही. घड्याळ नसल्याने मारकुटे मास्तर तासाची वेळ संपून वर्गाबाहेर पडण्याचीही शक्यता नसणार, त्यामुळे त्यांचा मार जास्त वेळ सहन करावा लागणार. घड्याळच नाही तर प्रत्येक तासानंतर शिपाई घंटा कशी वाजवणार. घड्याळ नसेल तर सर्व लोकांमध्ये शिस्त आणि नियमावली राहणार नाही. त्यामुळे सगळीकडेच अंदाधुंदी माजेल. एस.टी., रेल्वे, विमान यांना परिपत्रक नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होईल. अशाने आळशी लोकांना आनंद होईल पण कष्ट करणाऱ्यांना अशा गोष्टींचा त्रास होईल.

घड्याळे बनण्याच्या अगोदरही आयुष्य व्यवस्थित चालायचे. पृथ्वी वरती माणसाची वसाहत हजारो वर्षांपासून आहे, आणि तेव्हा घड्याळ नव्हते. पुरातन काळात लोक सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र यांच्या सहाय्याने वेळ मोजत असत. खूप लोकांना हे माहीत नाही की, वेदिक काळातही खूप अवगत वेळ मोजण्याची प्रणाली होती, अगदी परमाणु (१७ मैक्रोसेकंड्स) ते महा-मन्वंतर (३११.०४ ट्रिलियन वर्षे). तेव्हा २४ तास म्हणजे दिवसाला अहोतरम मध्ये मोजत, तर आजचे १.६ मिनिट्स म्हणजे “एक लघु” असे. त्याच प्रमाणे एक मास म्हणजे १ महिना, अयान म्हणजे ६ महिने, आणि समवत्सर म्हणजे वर्ष.

अशा बेधुंद जगात राहण्यापेक्षा वेळेचे भान दाखविणारे दोन काट्यांचे हे घड्याळ माणसाला माणुसकीने जगायला शिकवते. पशूपेक्षा मानवजीवन वेगळे आहे याची जाणीव करून देते. घड्याळ वेळ पाहून, वेळेचे भान ठेवून वक्तशीरपणाने काम करायला शिकवते. म्हणूनच आपल्यासाठी घड्याळ खूप महत्वाचे आहे.

Answered by halamadrid
2

■■घड्याळ नसता तर!■■

आपल्या जीवनात वेळ खूप महत्वपूर्ण आहे. वेळेची माहिती आपल्याला घड्याळाकडे पाहून मिळते. घड्याळ आपल्या सगळ्यांसाठी खूप उपयोगी आणि महत्वाची वस्तू आहे. अशा वेळी, जर घड्याळ नसता तर! लोकांना खूप समस्या होतील.

घड्याळ नसता तर, कोणीच वेळेवर उठणार नाही,झोपणार नाही,कामावर जाणार नाही,शाळेत जाणार नाही. कोणीच वेळेवर काम करणार नाही,अभ्यास करणार नाही.

घड्याळ नसता तर, ठरवल्या गेल्या वेळेवर मीटिंग होणार नाहीत.वेळेवर विमान,बस,ट्रेन, धावणार नाहीत,त्यामुळे आपल्याला कुठेही वेळेवर जाता येणार नाही.

घड्याळ नसता तर, आपण आपल्या हिशोबाने,आपल्याला पाहिजे तेव्हा काम करू,ज्यामुळे आपण आळशी बनत जाऊ. महत्वाची कामे वेळेवर न झाल्यामुळे लोकांचे फार नुकसान होईल.

घड्याळ नसल्यामुळे लोकांची फार गैरसोय होईल.तेव्हा,घड्याळ नसता तर! हा विचारच आपण करू नये.

Similar questions