India Languages, asked by ayeshanz5927, 1 year ago

Global warming che dushparinam in marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
140

जागतिक तापमानवाढ

वाढत्या तापमानामुळे आपल्याला खूप दुष्परिमानाला तोंड द्यावा लागतंय. तापमान वाढीमुळे बर्फ वितळत चालला आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढत चालली आहे. त्वचेचे रोगही मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत.

प्रदूषणामुळे ओझोन कमी होत असल्यामुळे सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत. गर्मी वाढत चालली आहे. तापमानवाढीच आणखी एक कारण म्हणजे घराघरांत लावलेली ए.सी. आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे.

Answered by shae92005
78

Answer:

Here's your answer. If you want you can eliminate the word BHARAT and instead add जग to it.

Explanation:

ग्लोबल वॉर्मिगचे दुष्परिणाम

भारताची विकासाच्या दिशेने गतीने वाटचाल होत असताना वातावरणीय बदल (ग्लोबल वॉर्मिंग) मात्र आपली वाट अडवून उभे आहेत. विकास आणि पर्यावरणीय बदलाचे व्यस्त प्रमाण भारतासाठी अडचणीचे ठरत आहे.

विकासाचा संबंध हा प्रामुख्याने औद्योगिकरणाशी घातला जातो आणि जीवनमान सुधारणे याचा अर्थ जीवनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे असा घेतला जातो. या सगळ्याच विकास असे म्हणण्याची प्रथा पडून गेली आहे. या विकासापोटी अनेक नैसर्गिक स्त्रोतांवर कुर्‍हाड कोसळली आहे. शेती, पाणी, जंगल या सगळ्यांना विकासाने गिळंकृत केले आहे.

मॉन्सूनचा बेभरवशीपणा वाढेल. त्याचे परिणाम मॉन्सून आधारीत शेतीवर होतील. नद्यांवरही होतील. सहाजिकच पिण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी पाण्याचा तुटवडा भासेल.

बर्फाच्छादित प्रदेश वितळल्याने समुद्राची पातळी वाढेल. परिणामी समुद्रकिनारी दाट वस्ती असलेल्या देशांना मोठा फटका बसेल. त्यामुळे मुख्य भूमीवर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल. समुद्राकाठची मॅनग्रोव्ह जंगले नष्ट होतील.

पूर येण्याचे प्रमाण आणि त्याच्या तीव्रतेतही वाढ होईल. किनार्‍यालगत रहाणार्‍या लोकांना याचा मोठा त्रास होईल.

या सगळ्या गोष्टी जपण्यासाठी आपल्याला आत्ताच योग्य ते उपाय करायला हवेत. अन्यथा आपला भविष्यकाळ आपल्या हातातून निसटून जाईल. चालत असताना पर्यावरणात होत असलेल्या या बदलाचे परिणामही दिसू लागले असून निसर्ग आता या बदलांच्या रूपाने आपल्यावर सूड उगवत आहे.

विकासाच्या मार्गावर धावायचे असेल तर औद्योगिकरण हवे. या औद्योगिकरणासाठी इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.गाड्यांपासून मोठमोठे कारखाने इंधनावर चालतात. सिमेंटची जंगले उभारण्यासाठी नैसर्गिक जंगलांची कत्तल केली जाते. विजेसाठीही कोळसा जाळावा लागतो, नाही तर पाणी चक्रात घालून तिची निर्मिती करावी लागते. या सगळ्यातून व्यय होणार्‍या वायूने आता अवघ्या जगाला कवेत घेतले आहे.

जगाचे तापमान त्यामुळेच वाढतेय. पण तेवढेच घडते आहे असे नाही. शेती आणि ग्रामीण विकासावरही याचा मोठा परिणाम होतो आहे, हे आत्ताच लक्षात घेतले पाहिजे. निसर्गाचे चक्र तर बदलतेच आहे. म्हणूनच उष्ण वारे वाहण्याचे प्रमाण वाढले आहे. वादळे, पूर सातत्याने येऊ लागले आहेत. याचा प्रामुख्याने परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे.मॉन्सूनचा बेभरवशीपणा वाढेल. त्याचे परिणाम मॉन्सून आधारीत शेतीवर होतील. नद्यांवरही होतील. सहाजिकच पिण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी पाण्याचा तुटवडा भासेल.

बर्फाच्छादित प्रदेश वितळल्याने समुद्राची पातळी वाढेल. परिणामी समुद्रकिनारी दाट वस्ती असलेल्या देशांना मोठा फटका बसेल. त्यामुळे मुख्य भूमीवर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल. समुद्राकाठची मॅनग्रोव्ह जंगले नष्ट होतील.

पूर येण्याचे प्रमाण आणि त्याच्या तीव्रतेतही वाढ होईल. किनार्‍यालगत रहाणार्‍या लोकांना याचा मोठा त्रास होईल.या नैसर्गिक बदलाचा मोठा परिणाम देशातील जंगलांवर होऊन त्यांचे प्रकारच बदलतील. त्यांची जैवविविधता संकटात येईल. सहाजिकच जंगलातील झाडांकडून मिळणारी फूल-फळादी उत्पादनावर परिणाम होईल.या सगळ्या गोष्टी जपण्यासाठी आपल्याला आत्ताच योग्य ते उपाय करायला हवेत. अन्यथा आपला भविष्यकाळ आपल्या हातातून निसटून जाईल.

Similar questions