India Languages, asked by atty2394, 1 year ago

(३) हे केव्हा घडेल ते लिहा.
(अ) कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल...........(अा) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल...........

Answers

Answered by Mandar17
13

"नमस्कार,

सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'कर्ते सुधारक कर्वे (लेखक- डॉ. शिरीष देशपांडे)' या गद्यातील आहे.


★ हे केव्हा घडेल ते लिहा.

(अ) कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल.

उत्तर- कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल *जेव्हा पुरुषांचेही शिक्षण होईल*.


(अा) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल.

उत्तर- स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल *जेव्हा ती उच्चविद्याविभूषित होईल.*



धन्यवाद..."

Answered by ksk6100
3

(३) हे केव्हा घडेल ते लिहा.

खालील हे केव्हा घडले या ओळी इयत्ता दहावीच्या कुमारभारती या पुस्तकातील " कर्ते सुधारक कर्वे " या पाठातील असून याचे लेखक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे हे आहेत. या पाठात लेखकांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांची महती सांगितली आहे.

(अ) कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल.

उत्तर- कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल, जेव्हा पुरुषांचेही शिक्षण होईल.

स्त्रियांमध्ये सुधारणा होण्यासाठी स्त्रिया शिक्षित होणे आवश्यक आहे. पण त्याहीपेक्षा पुरुष सुशिक्षित होणे अधिक आवश्यक आहे कारण पुरुष सुशिक्षित झाले तरच त्यांना स्त्री-शिक्षणाचे महत्व कळेल.

(आ) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल.

उत्तर- स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल, जेव्हा ती उच्चविद्याविभूषित होईल.

समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच असते, थोडी कमी किंवा जास्त भरेल. पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. पुरुष हा बोहूतांष वेळी स्वार्थी असतो. स्त्री अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील फक्त एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो. पूर्ण कुटुंब शिक्षित होते. म्हणून स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने स्थान दिले पाहिजे. स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल, जेव्हा ती उच्चविद्याविभूषित होईल.

Similar questions