इंदिरा गांधी यांच्यावर निबंध लिहा
Answers
आपल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणजेच इंदिरा गांधी, यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी उत्तरप्रदेश मधील इलाहाबाद येथे झाला. पंडित जवाहरलाल नेहरू व कमला नेहरू यांच्या त्या कन्या. इंदिरा गांधींना घरातूनच लहानपणापासूनच राजकारणाचे धडे मिळाले. त्यांनी लहानपणापासूनच आपली एक 'वानरसेना' चळवळ सुरु केली. तसेच 'बाल चरखा संघ' स्थापन केला. त्या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठातून झाले. १९४७ साली महात्मा गांधीच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील दंगलग्रस्त भागात त्यांनी काम केले. २६ मार्च १९४२ रोजी श्रीमती इंदिरा गांधी यांनी फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. १९५९-१९६० या वर्षी त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात माहिती व प्रसारण मंत्री, अनु-ऊर्जा मंत्री, पंतप्रधान तसेच परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. अश्या या थोर इंदिरा गांधींचे निधन ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी झाले.