I want letter of mom thanking giving in marathi
Answers
तीर्थरूप मुद्दाम म्हटलं नाही. कारण प्रिय म्हटल्यावरचा आपलेपणा काहीतरी वेगळाच असतो. त्या प्रियमध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर सगळं काही समाविष्ट असतं. तसं तर आपण रोज भेटतो. मग हे पत्र कशासाठी? असा प्रश्न तुम्हाला पडेल. रोज फेस टू फेस भेटून देखील मनातल्या सगळ्याच गोष्टी व्यक्त केल्या जात नाहीत. म्हणून मनातलं सगळं सांगण्यासाठी हे पत्र खास तुमच्यासाठी....
आजच्या पिढीचे आई-बाबा कधी मम्मी-पप्पा होऊन गेले समजलंच नाही. पण तुम्ही अजून तसेच आहात. ‘अंधार पडायच्या आधी घरी ये गं’, ‘प्रवास करताना जरा काळजी घेत जा’, ‘मजा-मस्ती पुरे. आता जरा अभ्यास करा’, ही अशी काही तुमची ठरलेली वाक्य. ज्यामधून माया, ममता दिसून येते. पण खरं सांगू का. आजच्या या पिढीला, आम्हा तरुणाईला नुसते उपदेश देणारे पालक नकोत तर उपदेश समजावून सांगून कुशीत घेणारे पालक हवेत. कारण उपदेशांना जर मायेची जोड मिळाली तर नाती अधिकच घट्ट होतात आणि आपलं नातं सदैव अतूट राहावं असंच वाटतं. जन्म घेतल्यापासून ओळखीच्या पहिल्या दोन व्यक्ती म्हणजे 'आई-बाबा'. आई-बाबा बोलता येत नव्हतं, त्याचा अर्थ काय आहे माहिती नव्हतं तेव्हापासून आपलं नातं आहे. बोलायला लागल्यावर पहिला शब्दही मूल बाबा असंच उच्चारतं. छोट्या-छोट्या शंका,उत्सुकता, प्रश्न, शाळेतील घडामोडी सगळं काही तुमच्याकडे येऊन सांगण्याची सवय लागते. पण नंतर मूल मोठं होतं आणि तुमच्या त्याच्याकडच्या अपेक्षाही मोठ्या होत जातात. ‘तू माझ्यासाठी अजून लहान आहेस गं’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतं होऊन जातं. कारण आम्ही मोठे झाल्यावर नकळतपणे आमच्याकडून तुमच्या अपेक्षा वाढत जातात आणि त्या आम्ही पूर्ण कराव्या, असा हट्ट असतो. पण आपलं मूल मोठ होतय आणि त्याच्यासोबत आपल्यालाही आपल्या विचारांनी मोठं व्हायला हवं, ही गोष्ट तुम्ही कुठेतरी विसरता. तुम्हाला दोष देत नाहीये. आम्ही खरंच तुमच्यापेक्षा वयाने, विचाराने, अनुभवाने खूप लहान आहोत. पण आज मनातलं सांगणं भाग आहे. मनातलं शेअर केल्याने मन हलकं होतं असं म्हणतात. म्हणूनच आज आमच्या पिढीची बाजू तुमच्यापुढे मांडायचीये. असं म्हणतात की परिवर्तन हे महत्त्वाचं असतं. माणसाने बदलाला स्वीकारून त्याप्रमाणे बदलावं. तसंच आमच्या पिढीचे विचार, वागणं, बोलणं समजून घेऊन तुम्ही थोडसं बदलावं असं आम्हाला वाटतं. कारण आपल्यातला जनरेशन गॅप हे आपलं नात कमकूवत करतो आणि मग आपल्यात नको असलेले वाद होतात. ‘आमच्या काळात हे असं होतं. आताच्या तुमच्या पिढीला हे समजतच नाही’, हे वाक्य तुमच्यासाठी बरोबर असलं तरी काळ बदलला की माणसाला काळाप्रेमाणे बदलावं लागतं.
हो, आम्हाला तुमचं म्हणणं पटतं. आम्ही ते आचरणात देखील आणतो. पण तुम्हीही थोडसं आम्हाला समजून घ्या ना! हेच कर, तेच कर अशी तुमची अपेक्षा असते. हा कोर्स करुन काय होणार? तो शेजारच्यांचा मुलगा बघ. असं तुम्ही चटकन सांगून जाता पण त्यापेक्षा आम्हाला काय करायचंय, त्यात काय आहे हे समजून घेऊन आमची बाजू तुम्ही लक्षात घेतली तर नात्यातला आपलेपणा अधिकच वाढेल. रोजच्या अनेक गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करताना कुठेतरी कनेक्शन लूज असल्याचा एरर येतो आणि त्यामुळे बेस्ट फ्रेंडवाल्या कनसेप्टचा जन्म होतो. मित्र नकोत अशातली गोष्ट नाही. पण माझे बाबा किंवा आईच माझे बीएफफ असले तर..!
आई गं आणि बाप रे... आमच्या रोजच्या वापरातील शब्द. त्याच्या मर्यादाही तुमच्या नावाचा उच्चार केल्याशिवाय होत नाही. छोटंस संकट असलं की आई आठवते आणि मोठ्या संकटाला बाबाच लागतो. म्हणूनच तुमच्याशिवाय जगण्याला अर्थ नाही. आज बरेच असे पालक आहेत, जे मुलांसोबत अगदी मित्रासारखे वागतात. त्यांना हवी ती मोकळीक देतात. आम्हाला पूर्ण मोकळीक द्या, असं आम्ही कधीच म्हणणार नाही. तुमचा धाक हा हवाच. पण तो धाक हा आदरयुक्त असावा. एवढीच इच्छा. तुमचा धाक आम्हाला बंधन वाटायला लागलं की मनात एक कटूता निर्माण होते आणि ती कटूता आम्हाला आपल्या नात्यात नकोय. पालक आणि मुलांच नातं एखाद्या झऱ्याप्रमाणे निखळ असावं. आम्ही काय करतो, कोणाला भेटतो, आमचे सिक्रेटस् सगळं काही तुमच्याशी शेअर करायला आम्हाला नक्की आवडेल. पण ‘हे आई-बाबांना सांगितल्यावर ते ओरडतील. काय वाटेल त्यांना’ हा विचार ज्यादिवशी आमच्या मनातून जाईल किंबहुना तुम्ही तो नष्ट कराल त्यादिवशी तुम्ही आई-बाबा कम मित्र जास्त व्हाल.