ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. (भौगोलिक कारणेलिहा)
Answers
Answer:
वरील दिले गेलेले विधान बरोबर आहे.
ईशान्य मान्सून आणि नैऋत्य मान्सून या दोन हंगामी वाऱ्यांमुळे(मोसमी वारे) भारताचा हवामान प्रभावित होतो. ईशान्य मान्सून वारे जे सामान्यत: हिवाळी मान्सून वारे म्हणून ओळखले जातात, जमिनीपासून समुद्राकडे वाहतात.तर नैऋत्य मान्सून वारे हिंदी महासागर,अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर ओलांडल्यानंतर समुद्रापासून जमिनीकडे वाहतात. नैऋत्य मान्सून देशात ,वर्षभरात सर्वाधिक पाऊस पाडतो.
जेव्हा नैऋत्य मान्सून भारतीय भूभागापासून माघार घेतो,तेव्हा सौम्य पावसाळी मोसमी वारे म्हणजेच ईशान्य मॉनसून वारे वाहतात. ते मुख्यतः बंगालच्या उपसागरातून ओलावा शोषतात आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात भारताच्या बर्याच ठिकाणी पाऊस पाडतात.
Explanation:
उत्तर :-
१) भारतात प्रामुख्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैर्ऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात.
२) भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैर्ऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात.
३) ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो.
अशा प्रकारे, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.