World Languages, asked by pi6hu5shmunchhikh, 1 year ago

Information on winter in marathi

Answers

Answered by huggingirl
2
हिवाळा हा आल्हाददायक ऋतू आहे. हिवाळ्यात सुरेख थंडी असते . अंगाला घाम येत नाही . थकवा येत नाही . कंटाळा येत नाही हिवाळ्यात उनसुद्धा प्रसन्न असते .

हिवाळ्यातील सकाळ खूप सुखद असते . सकाळी लवकर उठूच नये, असे वाटते . पण हिवाळ्यात पहाटे बाहेर फिरण्यातही वेगळीच मजा असते . हिवाळ्यात सकाळी धुके पडते . ते दृश्य खूप सुंदर असते . धुक्यात फिरताना छान वाटते . आपण उंच ढगातून हिंडत आहोत, असे वाटते .

हिवाळ्यात काही झाडांची पाने भुरुभुरु गळतात . जमिनीवर पानांचा सडा पडतो . हे दृश्य अतिशय सुंदर असते . या काळात काही झाडांवर फुले फुलतात . काही झाडांना फळे येतात .

हिवाळा ऋतू खूप आनंद देतो , उत्साह देतो . हा ऋतू कधी संपूच नये , असे मला वाटते .
Answered by Anonymous
1

Answer:

हिवाळा ह्या ऋतूला शीत ऋतू हि म्हटले जाते. हिवाळ्याची सुरवात डिसेंबरच्या महिन्यात होते आणि हा ऋतू सलग चार महिने म्हणजेच मार्च महिन्यात होळी पर्यंत असतो. हिवाळा हा एक आनंद देणारा ऋतू आहे असे म्हणने काही चुकीचे ठरणार नाही.

हिवाळ्या मदे सूर्याची तीव्र गर्मी नसते, तर संपूर्ण वातावरणा मदे गारवा असतो. ह्या ऋतू मदे लोकांची घामा पासून सुटका होते. हिवाळ्या मदे काम करयला फारसा कंटाळा येत नाही आणि काम करून पण खूप थकवा लागत नाही.

हिवाळा सुरु झाला आणि जशी थंडी चे प्रमाण वाडू लागते तसे-तसे सकाळी उठू नये आणि थोडा वेळ अजून झोपावे असेच वाटते, पण काय करणार शाळेत जायला उठायलाच लागते.

मि आणि माझ्या गावातील सर्व मित्र रविवारी एकत्र सकाळी लवकर उठून हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात चालायला निगतो. सकाळ-सकाळ चलायला खूप मज्या येते कारण वातावरण मस्त थंड असते सर्वी कडे धुके असतात, कधी-कधी इतकी धुके असतात कि समोरच काही दिसत नाही पण अश्या वातावरणात चालत अस्ताना असे वाटते कि आपण ढगान मदे चालत आहोतो, अश्या वातावरणात जाण्याची मज्या काही वेगळीच असते.

सूर्य उगवला तरी फारशी गर्मी पडत नाही उलट वातावरण मस्त थंड असते आणि अश्या वातावरणा मदे फिरायला कंटाळ येत नाही. हिवाळ्या मदे वातावरणा मदे देखील खूप बदल होतात. झाडांची पाने गळू लागतात आणि झाडांना नवीन पाने येऊ लागतात, झाडांच्या भवती पडलेली पाने खूप सुंदर दिसतात. झाडांनवर फुले येऊ लागतात आणि निसर्ग खूपच सुंदर दिसू लागते, जसे काही सगळी कडे सुंदर बागा बनवल्या आहेत

Similar questions