History, asked by PragyaTbia, 1 year ago

इतिहासलेखन म्हणजे काय ? (२५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.)

Answers

Answered by ksk6100
69

  इतिहासलेखन म्हणजे काय ? (२५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.)

उत्तर:- इतिहास लेखन म्हणजे काय हे खालील मुद्यांवरून स्पष्ट करता येईल.  

इतिहास लेखन म्हणजे वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी व्यवस्तिथरित्या करणे होय. प्राचीन काळात इतिहासलेखनाची परंपरा जगभर नव्हती. इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तो भूतकाळातील घटनांची निवड करीत असतो. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे व विशलेषण करणे. उपलब्ध माहितीचे संशोधन करणे तसेच त्याच्याशी निगडित संदर्भ शोधून काढणे. स्थळ, काळ, वेळ या सर्व गोष्टींची विस्तृत माहिती संदर्भासहित गोळा करणे. मिळालेल्या माहितीच्या संदर्भात योग्य त्या प्रश्नांची मांडणी करणे. भूतकालीन स्मृतींचे जतन करणे, मोठ्यांकडून/वडिलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या गोष्टी, कथा, गीते व पोवाडे, गुहाचित्रे यांद्वारे स्मृतींचे जतन केले जात असे. आधुनिक इतिहासलेखनात याच गोष्टी इतिहासाची साधने झाली होती. इतिहासकाराने निवडलेल्या घटना आणि त्याचा वैचारिक दृष्टीकोन यांवर त्याची लेखनशैली निश्चित होत असते. या पद्धतीने केलेल्या लेखनपद्धतीला 'इतिहासलेखन' असे म्हणतात.

Answered by santoshlashkare906
0

Answer:

इतिहास लेखनात पुढील बाबींचा समावेश होतो-

1 उपब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. 2 त्या माहितीची स्थान व काळ यांचा संदर्भात माहिती करून घेऊन त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे. 3उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे. या पद्धतीने केलेल्या लेखन पद्धतीला 'इतिहासलेखन' असे म्हणतात

Similar questions