Geography, asked by satonegaurav33, 2 months ago

जागतीकीकरण म्हणजे
Kay

Answers

Answered by loknadamjinaga1044
0

Answer:

जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. ह्या संज्ञेचा उपयोग बहुधा आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेबरोबर एकत्रीकरण करणे ,२० व्या शतकाच्या शब्दकोशानुसार जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे ,एकाच वेळी संपूर्ण जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे ,त्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी खुले केले जाते. विश्व बॅंकेच्या अहवालानुसार जागतिकीकरण म्हणजेअ- १) उपभोग्य वस्तुंसह सर्व वस्तुंच्या आयातीवरील नियंत्रण हळूहळू समाप्त होणे. २) आयात शुल्काचा दर कमी करणे. ३) सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करणे होय. दिपक नायर यांच्या मते, देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजेच जागतिकीकरण होय. डॉ. यशवंत मनोहर यांच्या मते जागतिकीकरण म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशांनी परस्पर व्यापार करणे होय.[१]

भारतात १९९० च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरुवात झाली. ह्या काळात देशावरचे विदेशी कर्ज एवढे वाढले होते की जागतिक बॅंक (World Bank), आंतरराष्ट्रीय नाणे निधी (International Monetary Fund) ह्या खाजगी जागतिक संघटनांनी भारताला आणखी कर्ज देणे नाकारले व कर्ज मिळवण्यासाठी भारतावर काही अटी लादल्या. ह्या अटींमध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही धोरणात्मक बदल करून तिला विदेशी कंपन्यांसाठी खुले करणे समाविष्ट होते. अर्थव्यवस्थेमधील ह्या बदलांना "आर्थिक सुधारणा" म्हटले गेले व त्यात जागतिकीकरणासोबतच उदारीकरण व खाजगीकरण ह्यांचा पण समावेश होतो. ह्यांनाच एकत्रितपणे खा.ऊ.जा. धोरण असे संबोधले जाते. संजय भास्कर जोशी यांच्या मते, मुख्यत: व्यापारासाठी विविध देशांनी एकमेकांना जोडून घेत एकमेकांच्या भूमीत खुलेपणाने व्यापार करण्यासाठीची व्यवस्था निर्माण करणे म्हणजे जागतिकीकरण होय. मो. वि. भाटवडेकर यांनी नोंदविल्याप्रमाणे, 'देशात खुला व्यापार, गुंतवणुकीसाठी मोकळी बाजारपेठ आणि तंत्रज्ञान व कुशल व्यावसायिकांना देशांतर करण्यास सुलभ कायदे कानून अशी जागतिक व्यवस्था म्हणजे जागतिकीकरण होय.' [२] जग ही एक बाजारपेठ असणे जागतिकीकरणाचे ध्येय आहे , परकीय क्षेत्राचे उदारीकरण केल्यास औदयोगिक उत्पादने आपोआप परकीय क्षेत्राशी जोडली जातात , त्यामुळे अप्रत्यक्षपणे बँकिंग आणि सेवाक्षेत्रही परकीय क्षेत्राकडे आकर्षित होतात . विविध देशांची परकीय क्षेत्रे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थाही एकमेकांशी संलग्न होतात , जागतिकीकरण होऊ लागते , उत्पादनाचे वितरण स्थानिक स्तरापर्यंत होत असेल तर त्याला स्थानिकीकरण असे संबोधतात , याउलट उत्पादनाचे वितरण देशादेशामध्ये होत असेल, तर त्याला आंतरराष्ट्रीयकरण असे म्हणतात ,परंतु जागतिकीकरण आंतरराष्ट्रीयीकरणापेक्षा मोठी आणि व्यापक संकल्पना आहे .जागतिकीकरणात फक्त उत्पादनाचे वितरणच नाही तर त्यासोबत बाजार ,नियम , कररचना , आयातशुल्क , साहाय्य,विक्री , व्यापार संघटन , तोडगा अशा व्यवसायाशी निगडीत सेवांचा देखील समावेश असतो, आंतरराष्टीयकारणात राष्ट्र एकक मानून उत्पादनांची देवाणघेवाण होते , जागतिकीकरणात व्यापाराच्या दृष्टीने राष्ट्रांच्या सीमा फिकट होतात , त्या इतक्या फिकट होतात की, व्यापाराच्या दृष्टीने स्थलांतर आणि भांडवलाचे मुक्त वहन होऊ लागते. जागतिकीकरण हे दळणवळण आणि तंत्रज्ञानामुळे तीव्र होत जाते , ते रोखणे कठीण असते

जागतिकीकरण म्हणजे

१) ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील , अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे .

२) जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरविणे , संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे .

३)देशाच्या बृहतलक्षी घटकांपैकी 'परकीय क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र असणे .

Answered by lohitjinaga
1

Answer:

✧══════•❁❀❁•══════✧\huge\color{Pink}\boxed{\colorbox{Black}{❥what is Energy??}}❥what is Energy??\ \textless \ br /\ \textgreater \ \huge\boxed{\text{❥Drop Some♡}}❥Drop Some♡ ✧══════•❁❀❁•══════✧✧══════•❁❀❁•══════✧

❥what is Energy??

❥what is Energy?? \textless br/ \textgreater

❥Drop Some♡

❥Drop Some♡ ✧══════•❁❀❁•══════✧

✧══════•❁❀❁•══════✧\huge\color{Pink}\boxed{\colorbox{Black}{❥what is Energy??}}❥what is Energy??\ \textless \ br /\ \textgreater \ \huge\boxed{\text{❥Drop Some♡}}❥Drop Some♡ ✧══════•❁❀❁•══════✧✧══════•❁❀❁•══════✧

❥what is Energy??

❥what is Energy?? \textless br/ \textgreater

❥Drop Some♡

❥Drop Some♡ ✧══════•❁❀❁•══════✧

Similar questions