जूण्या किल्ल्याचो आत्मगूप्त
Answers
राम राम मंडळी। मी शिवनेरी बोलतोय. तुम्ही मला शिवाजी महाराजांचा किल्ला म्हणूनही ओळखत असाल. आज मी तुम्हाला माझे मनोगत सांगणार आहे.
माझी बांधणी तशी ११ व्या शतकात यादवांनी केली, परंतु खरी ओळख मात्र महाराजांमुळे मिळाली. सगळे मला शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणूनच ओळखतात. माझा आकार शंकराच्या पिंडीसारखा असून चारही बाजूंना भयंकर चढाव आहे. शेंड्यावर भावणीदेवी चे मंदिरही आहे.
तेव्हापासून अनेक राजे आले-गेले. सगळ्यानी माझ्या संपत्तीचा वापर करून घेतला. मोठमोठ्या तोफांचा साठा असायचा. सगळे निसर्ग रम्य वातावरण सगळ्यांना मोहून टाकायचे. माझ्या या दीर्घ आयुष्यात अनेक ऐतिहासिक गोष्टीचां साक्षीदार आहे.
परंतु आता मी जुना झालोय. पुरातन बांधकाम पडायला लागलीत. सरकारने डागडुजी कडे दुर्लक्ष चालवलय. आता पर्यटकांसाठी असुरक्षित म्हणून घोषित केला जाईल. आता या सरकारने जीर्णोद्धार साठी आर्थिक मदत मंजूर करणे याच एक यावर उपाय आहे.
तुमचा मित्र
आदित्य