जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा .
Answers
★ उत्तर - नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली आहे.मानवी फायदयांच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमरीत्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात.
जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम
1)पिकांच्या डी. एन. ए. मध्ये बदल घडवून जनुकीय
सुधारीत वाण निर्माण केले जात आहेत.बहुदा असे वाण निसर्गात आढळत नाहीत.म्हणजेच नव्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या जातात. या प्रजातींमध्ये निरनिराळे उपयुक्त गुणधर्म संकरित केले जातात.
2)वातावरणीय टॅन सहन करण्याची क्षमता - सातत्याने बदलणारे तापमान , ओले व सुके दुष्काळ , बदलते हवामान हे सर्व वातावरणीय टॅन काही नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत, पण GM सुधारित प्रजाती मात्र यांपैकी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वाढतात.
3)उपद्रवी कीटक , रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता ह्या प्रजातींमध्ये असल्याने जंतूंनाशके कीटकनाशके,तणनाशके अशा घटक रसायनांचा वापर टाळता येतो
4) GM प्रजातीच्या बियानांमुळे पिकांच्या नासाडीत घट होते व पोषणमूल्यांत वाढ होते.
धन्यवाद...