Art, asked by pravinshinde3452, 4 months ago

'जशी दृष्टी तशी सृष्टी' या वचनातील विचार स्पष्ट करा.​

Answers

Answered by sahilzambre281
12

Answer:

main meaning : आपण जसा विचार करतो तस आपल्याला जग दिसायला लागतं

Explanation:

मनुष्याची जशी दृष्टी असेल, तशी त्याची वृत्ती (दृष्टिकोन) आपोआपच होते आणि जशी वृत्ती असेल त्यानुसार त्याची कृती अथवा व्यवहार त्यामुळे महात्मा तोच बनतो. ज्याची दृष्टी आणि वृत्ती महान असते. ज्याची दृष्टी दुस-याच्या अवगुणांवर वा दुर्गुणांवर जाते; त्याच्या मनात साहजिकच त्या व्यक्तीविषयी घृणा, द्वेषभाव निर्माण होतो. परिणामत: तो स्वत:च दु:खी व अशांत बनतो.

ज्याप्रमाणे दृष्टीचा प्रभाव वृत्तीवर पडतो त्याप्रमाणे वृत्तीचाही प्रभाव दृष्टीवर पडत असतो. मनुष्याची वृत्ती जर सत्त्वगुणी अथवा चांगली असेल तर त्याची दृष्टीदेखील त्यानुसार सत्त्वगुणीच असेल व त्यानुसार त्याचा व्यवहार देखील क्षमाशील, गुणग्राही, निर्दोष आणि कल्याणकारी भावनायुक्त असेल. अशाप्रकारे दृष्टी व वृत्ती एक दुस-याला प्रभावित करीत असतात व त्यानुसार आपला व्यवहार होत असतो, हे एक शाश्‍वत सत्य आहे व ते सर्वांना लागू आहे. हे शाश्‍वत सत्य ध्यानी धरून प्रत्येकाने दैहिक दृष्टीचा त्याग करून सर्वांना आत्मस्वरूपात बघायला पाहिजे.

Similar questions