India Languages, asked by Vainavik, 1 year ago

झाड-तक्रार -मुलगा -बक्षिस ( story from the given words in Marathi)​

Answers

Answered by Hansika4871
3

कणकवली ह्या छोट्या गावात पालिके ने रस्ता रुंदीकरण साठी गावातली २५ झाडे कापण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तसा मोठाच होता कारण लोकांना त्या परिस्थितीत झाडांचे महत्त्व माहीत होत्ते. त्या गावातच निसर्गप्रेमी, हुशार राजेश नावाचा मुलगा राहत होता. निसर्गाला इजा पोहोचवली की राजेश च्या मनाला खूप यातना होत.

पालिकेचा निर्णय राजेशच्या कानांवर येऊन पडला व त्या झाडांचे रक्षण करण्यासाठी (कारण कमी झाडाचे तोटे गावावर दिसत होते उदा. पाऊस न येणे, प्रदूषण, सावली इत्यादी) त्याने निसर्गप्रेमी संस्था हीला पत्र लिहिले व त्यांच्या मदतीने राजेश व त्याचे गाववाले उपोषणाला बसले.

उपोषण २ दिवस चालले व शेवटी झाडे कापण्याचा निर्णय पालिकेने मागे घेतला.

ह्या कामासाठी राजेशला संपूर्ण गावात ओळखले जाते व त्याला बक्षीस सुद्धा देण्यात आले.

Similar questions