Geography, asked by StarTbia, 1 year ago

कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
(अ) जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे?
(आ) दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा.
(इ) सर्वांत मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे? ते ठिकाण कोणते?
(ई) सर्वांत कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता?

Attachments:

Answers

Answered by SnehaPatil2
15

अ) टिंब पद्धतीने.

आ) पश्चिमेकडील, काही दक्षिणेकडील भाग व काही उत्तरेकडील भागात लोकसंख्या विरळ होत गेलेली आहे.

पुर्वेकडील भागात लोकसंख्या दाट आहे.

इ) सर्वात मोठा गोल असणाऱ्या ठिकाणी लोकसंख्या सुमारे विस लाख आहे.

ई) सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका गगनबावडा होय.

Answered by gadakhsanket
23
★ उत्तर - अ ) जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण टिंब पद्धतीने दाखवले आहे.

आ) दिशांच्या संदर्भात उत्तर आणि पूर्व दिशेत लोकसंख्येचे वितरण दाट आहे असे दाखविले आहे.तर पश्चिम दिशेला लोकसंख्येचे वितरण विरळ आहेअसे दाखविले आहे.

इ) सर्वात मोठा गोल कोल्हापूर (करवीर तालुका)या ठिकाणी आहे . त्याची लोकसंख्या वीस लाख इतकी आहे.

ई) सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका गगनबावडा हा आहे.त्याची लोकसंख्या पन्नास हजार आहे.

धन्यवाद....
Similar questions