कोणत्या गोष्टीचा ध्यास व छंद जडावा असे तुम्छला वाटते
पुतेदवाक्यात लिहा
→
Answers
Answer:
आवड आणि छंद यामधे कोणता सुक्ष्म फरक आहे?
फार सूक्ष्म फरक आहे आणि त्यामुळे शब्दांकित करणे जरा कठीण आहे पण प्रयत्न करतो.
आवड ही जर फक्त प्राथमिक आणि उथळ अवस्था असेल तर मला वाटते की छंद ही त्याची पुढची पायरी आहे. कदाचित त्याचा अतिरेक झाला तर मर्यादित अर्थाने व्यसनसुद्धा म्हणावे लागेल.
मला रोज गोड खायला आवडते म्हणजे गोड पदार्थ खाणे ही माझी आवड आहे पण गोड खाणे हा माझा छंद आहे असे म्हणणे चूक होईल.
मला दारू प्यायला आवडते म्हणजे दारू पिणे हा माझा छंद आहे असे म्हणणे चूक होईल.
पोस्टाची तिकिटे जमवणे हा माझा छंद आहे. आवड असल्याशिवाय कोणताही छंद विकसित करता येईल असे वाटत नाही.
आवड असण्यासाठी काही नियम किंवा शिस्त असण्याची फारशी गरज नाही परंतू छंद थोडेसे जास्त गांभीर्य किंवा खोली दर्शवतो त्यामुळे त्यात काही शिस्त असणे आवश्यक आहे.
आवड असते आणि छंद जोपासला जातो.
वरील उत्तर हा शब्दांच्या अर्थाचा मागोवा घेत केलेला एक तर्क आहे.