किरण बेदी – माहिती, निबंध, भाषण मराठी मध्ये- Kiran Bedi
Answers
Answer: किरण बेदी या सामाजिक कार्यकर्त्या आणि निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. त्या पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल आहेत. 1972 मध्ये पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर किरण बेदी 2007 मध्ये सेवेतून निवृत्त झाल्या.
त्या भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. आपल्या सेवाकाळात त्यांनी अत्यंत प्रभावशाली काम केले आहे. तुरुंगासुधारणेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभी राहणारी महिला पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख होती.
Explanation:
■■ किरण बेदी■■
किरण बेदी यांचा जन्म अमृतसर मध्ये ९ जून,१९४९ रोजी झाला होता.भारतीय पोलिस सेवा मध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.त्या एक थोर सामाजिक कायकर्ता आणि राजकारणी आहेत.
महिला सशक्तिकरणासाठी आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध भारताच्या लढाईत त्या नेहमीच आणि आता सुद्धा प्रमुख भूमिका निभावतात.
किरण बेदी यांनी नवज्योती आणि इंडिया विज़न फाउंडेशन नावाचे एनजीओ सुरु केले. या एनजीओचे उद्देश्य होते, प्राथमिक शिक्षण प्रदान करणे, प्रौढ साक्षरता कार्यक्रम राबवणे, महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे.
त्या एक प्रतिष्ठित टेनिसपटू आहेत आणि त्यांनी विविध आशीयाई चैम्पियनशिप जिंकल्या आहेत.त्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी देश आणि विदेशातून वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत.
त्या महिलांसोबतच आपल्या सगळ्यांसाठीच एक आदर्श आहेत.