English, asked by Bhagyashribuddhiwant, 11 months ago

कावळ्या किल्ला स्पष्टीकरण दया​

Answers

Answered by abhijitpatil79
6

Explanation:

छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या मोहनगडाचे नेमके ठिकाण शोधल्याचा दावा डेक्कन कॉलेजातील पूरातत्त्व विभागाचे अभ्यासक सचिन जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. वरंधा घाटात नीरा नदीच्या उगमाजवळ हा किल्ला आहे. जासलोडगड उर्फ मोहनगडाचा उल्लेख १३ मे १६५९ रोजी बाजीप्रभू देशपांडे यांनी लिहिलेल्या पत्रात येतो. हा किल्ला मावळात असून तो ओस पडल्याचे या पत्रात म्हटले आहे.

खुद्द शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकीदीर्त एकंदर जे ३६० किल्ले जिंकले त्याचा उल्लेख बखरीत असल्याचे घाणेकरांनी सांगितले. मोहनगडाचा उल्लेख महाराजांच्या किल्ल्यात आहे हे बरोबरच आहे, असे सांगून घाणेकर म्हणाले की, ज्येष्ठ दिवंगत लेखक गो. नी. दांडेकर या किल्ल्यास प्रेमाने कैवल्यगड असे टोपण नाव देऊनही संबोधत असत. आपण म्हणत असणारा कावळा किल्ला हा मोहनगडाचाच एक भाग असावा, कारण असे अनेक जोडकिल्ले शिवकालात आढळतात. लोहगड-विसापूर , पुरंदर-वज्रगड जसे जोडकिल्ले आहेत, तसा कावळ्या किल्ला व मोहनगड हे जवळचे किल्ले असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

हा मोक्याच्या ठिकाणी (विकीमॅपीआ) आहे. इथून तोरणा, राजगड, प्रतापगड, मकरंदगड, रायगड असे किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात. चढायला सोपा आणि पायथ्यापर्यंत गाडी जाते म्हणून एका दिवसात होतो. ह्यालाच जोडून कावळ्याही करता येतो किंवा एखादा दिवस वाढवला तर चंद्रगडही करता येतो. वरंध घाट उतरला की ज्या गावच्या नावे हा घाट आहे ते वरंध गाव लागते. तिथून २-३ कि.मी महाडच्या दिशेने गेले की ढालकाठी म्हणून एक फाटा (विकीमॅपीआ) लागतो. (शिवथरघळीच्या फाट्याच्या पुढे). तिथून डावीकडे (वरंधा कडून महाडकडे येताना) १७ कि.मी. वर हा गड आहे. हा १७ कि.मी चा रस्ता काही डांबरी आणि काही कच्चा आहे. हा रस्ता पिंपळवाडी ह्या गावाला नेऊन पोचवतो. तिथे गाडी लावायला शाळेजवळ जागा आहे. जवळच हातपंपावर पाणीही भरून घेता येते. रात्री वस्ती करायला शाळेचा व्हरांडा उपयोगी पडू शकतो. १०:३० ला गावात पोचलो आणि थेट गडावर

Similar questions