India Languages, asked by karthik264, 1 year ago

kamgarache atmacharitra in marathi essay

Answers

Answered by princetyagi368
1

द्रव्यरूपाने वा वस्तुरूपाने मिळणाऱ्या मोबदल्यात शारीरिक वा मानसिक श्रम करणार्‍या प्रत्येक व्यक्तिस ‘कामगार’ अशी संज्ञा आहे. निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने जे शारीरिक व मानसिक श्रम केले जातात, ते कामगारासंबंधी विचार करताना वगळले पाहिजेत. या दृष्टीने सर्व क्षेत्रांतील मजूर, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांतील पांढरपेशे नोकर यांचा समावेश कामगारवर्गात व्हावयास हवा. मात्र अनेकदा ‘कामगार’ असा ज्यावेळी निर्देश केला जातो, त्यावेळी भूहीन मजूर वा वरिष्ठ श्रेणीचा पांढरपेशा नोकरदारवर्ग आपल्या दृष्टीसमोर येत नाही. भांडवलदारवर्गाने चालविलेल्या छोट्या मोठ्या कारखान्यांत श्रम करून आपली उपजीविका करणारा श्रमिकांचा वर्ग कामगारवर्गात अंतर्भूत केला जातो. आधुनिक अर्थरचनेत कामगारांना नेमणारा व्यवस्थापकही बरेच वेळा कोणीतरी नेमलेला असतो. तोदेखील वास्तविक कामगारच असतो. पण व्यवहारात आपण एकीकडे भांडवलदार व व्यवस्थापक वर्ग आणि दुसरीकडे मजूर असा भेद करतो व त्या दृष्टीने कामगारांच्या प्रश्नांकडे पाहतो.

श्रमिकवर्गास, विशेषतः शारीरिक श्रमक करणार्‍यांस जी सामाजिक प्रतिष्ठा असते, तीवरून समाजाची घडण व मूल्ये यांचा अंदाज बांधता येतो. रोमन साम्राज्यकाळी लढाईत जिंकलेल्यांना मजुरी करावी लागे. शेती व इतर कष्टाची कामे ह्या गुलामांकडून करून घेऊन त्यांच्या जिवावर रोमन साम्राज्यकर्ते चैन करीत. ख्रिस्ती धर्मग्रंथांनी व कॅल्व्हिनसारख्या लेखकांनी ‘श्रम हीच ईश्वराची पूजा’ असे म्हटले असले, तरी यूरोपच्या आर्थिक इतिहासात श्रमजीवींबद्‌दल तुच्छताच आढळते. मध्यमयुगात सरदार, 

hope its helps u.....✌✌

Answered by AadilAhluwalia
2

मी तो आहे, जो राबतो, घाम गळतो आणि जे काही मिळेल, त्यांनी मीठ भाकरी कमावतो.

मला कष्टकरी , रबणारा आणि काम करणारा म्हणून संबोधले जाते.

हो! बरोबर ओळखलंत, मी एक कामगार आहे. तुमचा घराचा समोर जी इमारत बनत आहे ना? त्या इमारतीचे बांधकाम करतोय मी.

मोल-मजुरी करून मी माझ्या कुटुंबासाठी पैसे कमावतो. सकाळी पहाटे उठून मी आपला घमेल घेऊन घराबाहेर पडतो आणि बांधकामाचा इथे जातो. आपले नाव नोंदवून मी माझा कामाला लागतो. घमेल भरून रेती आणि विटा वर घेऊन जाणे हे माझे काम आहे. मी ते डोक्यावर घेऊन इमारत चढतो. माझी मुलं शाळेत जात नाही याची खंत नेहमी मनात असते पण काय करू? एवढा पैसा नाही माझा जवळ कि मी मुलांना शाळेत पाठवू. मी प्रयत्न करतोय मी मी त्यांचे सर्व इच्छा पूर्ण करू शकेन. कारण जे मी भोगलाय ते मी याना कधीही भोगून देणार नाही.

असो, आता जावं लागणार. साहेब बोलवत आहेत. येतो मी, राम राम!

Similar questions