खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
१. चौकटी पूर्ण करा.
(अ) अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू - ................. ................. .................. ......................
अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे
बांधण्यापर्यंत दगडाला नानातऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्या रे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्या नंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्या प्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक संबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि त्याच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला.
Answers
Answered by
10
निवारा लेणी शिल्पे अश्मयुगीन माणूस यांनी तयार केली...
Answered by
17
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "हसरे दुःख" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक भा. द. खेर. आहे.
या पाठात चार्ली आणि त्यांच्या आईमधील
प्रेमाचे वर्णन केले आहे तसेच चार्लीच्या रंगमंचावरील पदार्पणाचे वर्णन केले आहे.हा पाठ 'हसरे दुःख'या पुस्तकातून घेतला आहे. या पाठात चार्ली चॅपलिनच्या आईवर स्टेजवर ओढावलेलं प्रसंग त्यांनी किती सहजतेने सोडविला याचे वर्णन केले आहे.
★(अ) अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू - चूल,भांडीकुंडी,औते-हत्यारे, दागदागिने.
धन्यवाद...
Similar questions