(७) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधा.
(अ) शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.(आ) वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत
Answers
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'कर्ते सुधारक कर्वे (लेखक- डॉ. शिरीष देशपांडे)' या गद्यातील आहे.
★ खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधा.
(अ) शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.
उत्तर- मनात घर करून राहणे - म्हणजे कायमचे लक्ष्यात राहणे
(आ) वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.
उत्तर- पचनी न पडणे - म्हणजे न समजले किंवा न पटणे
धन्यवाद..."
(७) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधा.
खालील वाक्य हे इयत्ता दहावीच्या कुमारभारती या पुस्तकातील " कर्ते सुधारक कर्वे " या पाठातील असून याचे लेखक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे हे आहेत. या पाठात लेखकांनी महर्षी कर्वे यांच्या कार्याची महती सांगितली आहे तसेच त्यांच्या चळवळीची माहिती दिली आहे.
(अ) शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.
उत्तर :- मनात घर करून राहणे.
वरील वाक्यातील वाक्यप्रचार मनात घर करून राहणे म्हणजे काही घटना या नेहमीसाठी आपल्या मनात साठवून ठेवल्या जाते, त्या आपल्याला निरंतर आठवत असतात.
(आ) वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.
उत्तर :- पचनी ना पडणे.
वरील वाक्यातील वाक्यप्रचार पचनी न पडणे म्हणजे काही गोष्टींचा सारांश ऐकूनही किंवा त्याचे वेगवेगळे दाखले देऊनही समजत नसेल म्हणजेच पचनी ना पडणे होय .