(१०) स्वमत.
(अ) ‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे’, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.
(आ) ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट
करा.
(इ) ‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वेयांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत
सांगा.
Answers
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'कर्ते सुधारक कर्वे (लेखक- डॉ. शिरीष देशपांडे)' या गद्यातील आहे.
★ स्वमत -
(अ) स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन -
उत्तर- अण्णांच्या मते, स्रियांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांना शिक्षण देणे महत्वाचे आहे. स्रिया म्हणजे अर्धा समाज जर त्या अशिक्षित राहिल्या तर अर्धा समाज मागासलेला राहील. स्रियांच्या सुधारणेसाठी त्यांचे शिक्षण होणे आवश्यक आहे.
(आ) जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते उत्तर- महर्षी कर्वे हे स्रियांना स्वतंत्र करण्यासाठी आयुष्यभर कार्यरत होते. या त्यांच्या विचाराला समाजाने कडक विरोध केला. काही नाठाळ लोकांनी त्यांच्यावर हल्ले चढवले. टिकाकारांशी वाद न घालता शांतपणे ते कार्य करत. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला.
(इ) ‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण -
उत्तर- महर्षी कर्वे हे खूप विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते फक्त दुसऱ्यांना सांगून शांत बसत नव्हते. समाजात सुधारणा पाहिजे असेल तर आपणच सुरुवात केली पाहिजे हे त्यांचं मत होतं. स्त्रीयांना स्वतंत्र करणे यालाच त्यांनी आयुष्याचे ध्येय बनवले. त्यांना लोकांनी त्यांच्या या कार्याला भरपूर विरोध केला, परंतु त्या टीकाकारांना शब्दाने उत्तर देण्यापेक्षा कृतीने उत्तर द्यायचे महर्षींनी ठरवले. यातून त्यांचे वेगळेपण दिसून येते.
धन्यवाद..."
(१०) स्वमत.
(अ) ‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे’, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.
उत्तर :- पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्रित असतो. या स्त्री अधिक सामाजिक असते. त्यामुळे कुटुंबातील पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. अण्णांच्या मते कुटुंबातील स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुष्यांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे.
(आ) ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा.
उत्तर :- अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पहिले होते. ते फार मोठी झेप घेऊ पाहत होते. त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही. समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही. साथ तर दिली नाही उलट त्यांचा विरोधच केला. त्यांचा सतत अपमान केला,त्यांचे कपडे फाडलेत,त्यांना धक्काबुक्की केली, हे रोजच घडत होते. त्यामुळे स्वतःचे कपडे रोजच त्यांना शिवावे लागत असे. ते स्त्री-शिक्षणासाठी देणग्या गोळा करीत असे त्यातही लोक त्यांना भ्रष्टाचाराचा धाक दाखवत असे. त्यांच्यावर व कुटुंबावर समाजाने बहिष्कार टाकला होता. लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या. त्यांनी आपल्या जीवनात दुःख,कष्ट आणि यातूनच सहन केल्यात. म्हणून ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला लागू पडते.
(इ) ‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वेयांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर :- कुणावरही ना रागावता अण्णासाहेब आपले काम करीत असत. त्यांना समाजाने साथ तर दिली नाही उलट त्यांचा विरोधच केला. त्यांचा सतत अपमान केला,त्यांचे कपडे फाडलेत,त्यांना धक्काबुक्की केली तरीही ते शांत राहिलेत व नव्या उम्मीदिनी व आत्मविश्वासाने काम करीत राहिले. हाच अण्णासाहेबांच्या वेगळेपण मला खूप आवडला.