(५) खालील वाक्यांत योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्ये पुन्हा लिहा.
(रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे, व्यथित होणे)(अ) लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.(आ) गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.(इ) मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.(ई) सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
Answers
"नमस्कार मित्रा,
हा प्रश्न कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील वसंतहृदय चैत्र या पाठातील आहे. दुर्गा भागवत यांनी लिहिलेल्या या साहित्यात अलंकारिक भाषेत चैत्र महिन्याचे सौंदर्यविशेष व्यक्त केले आहे. या पाठात वसंताचे उत्तम वर्णन बघायला भेटते.
★ कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्ये पुन्हा लिहा -
(अ) लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.
उत्तर- लहानसहान अपयशाने *व्यथित होणे* अयोग्यच.
(आ) गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.
उत्तर- *रुंजी घालत* भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.
(इ) मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.
उत्तर- मोठ्या माणसांबद्दल *कुचेष्टा करणे* हासुद्धा अपराधच.
(ई) सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
उत्तर- सध्या घरामध्ये उंदरांचे *पेव फुटल्यामुळे* अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
धन्यवाद..."
(५) खालील वाक्यांत योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्ये पुन्हा लिहा.
(रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे, व्यथित होणे)
उत्तर:- खालील सर्व वाक्य "वसंतहृदय चैत्र " या पाठातील असून याच्या लेखिका "दुर्गा भागवत" या आहेत. या पाठात चैत्र महिन्याचे सोंदर्यकिरण लेखिकेने सादर केले आहे .
(अ) लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.
उत्तर :- लहानसहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच.
(आ) गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.
उत्तर :- रुंजी घालत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.
(इ) मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.
उत्तर :- मोठ्या माणसांबद्दल कुचेष्टा करणे हासुद्धा अपराधच.
(ई) सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
उत्तर :- सध्या घरामध्ये उंदरांचे पेव फुटल्यामुळे अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.