खेळून रंगपंचमी, फुलपाखरे भिजली सारी
हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी
हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू...(रसग्रहन सांगा )
Answers
Answer:
दिलेल्या पद्यपंक्ती या प्रसिद्ध निसर्गकवी नलेश पाटील यांच्या 'झाडांच्या मनात जाऊ' या निसर्ग कवितेतील आहेत. निसर्गाचे वैविध्यपूर्ण रंग आणि रूप कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून दाखवतात.
Explanation:
प्रस्तुत ओळींच्या माध्यमातून कवी म्हणतात, की आकाशात उडणारा फुलपाखरांचा थवा म्हणजे जणू तोरणच दिसत आहे. मनसोक्तपणे पावसात भिजून या फुलपाखरांनी जणू रंगपंचमी साजरा केली आहे आणि रंगपंचमी खेळल्यामुळे सर्व रंग त्यांच्या शरीरावरती पसरलेले आहेत. त्याच सुंदर रंगांमुळे फुलपाखरे हे अप्रतिम व रंगीत अशा पताकांसारखे दिसत आहेत. आणि म्हणूनच त्या पताकांना तोरण समजून आपल्या दारावर आणून लावावे. कारण त्या सुंदर फुलपाखरांमुळे आपले दार देखील अतिशय सौंदर्यवान होईल असे कवीला वाटते. निसर्गाची ताकद आणि सुंदरता कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून स्पष्ट करतो.
Explanation:
hope u like it
it ur likie
