Math, asked by rutikshagaonkar6482, 1 year ago

मोबाइल नसता तर निबंध मराठी

Answers

Answered by halamadrid
23

◆◆मोबाइल नसता तर!!◆◆

मोबाइल नसता तर!! हा विचार प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करतो.कारण आजच्या युगात मोबाइल हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे.

मोबाइलचे अनेक फायदे आहेत.जगातील बहुतांश लोकांशी आपण मोबाइलमुळे संपर्क साधू शकतो.मोबाइलमुळे आपल्याला घरबसल्या कार्यालयाचे काम करता येते.

मोबाइलमुळे आपण घरबसल्या वस्तूंची खरेदी करू शकतो तसेच त्यावरून लाइट,गॅस,इत्यादि चे बिल भरता येते.मोबाइलमुळे आपले मरनोरंजन होते,तसेच बातम्या व खेळाचे थेट प्रसारण पाहता येते.म्हणून मोबाइल हा हवाच.

पण मोबाइलचे काही तोटेदेखील आहेत.मोबाईलमुळे आपण आपल्या कामावर,अभ्यासावर नीट लक्ष देत नाही.सारखं मोबाइकडे पहिल्यामुळे आपल्या डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो.

काही लोक सामाजिक हिंसा व खोटी बातमी पसरवण्यासाठी फेसबुक,व्हाट्सअॅपचा वापर करतात.अश्लील चित्रे,एमएमएस बनवून लोकांना ब्लैकमेल केले जाते.तेव्हा असे वाटते की मोबाइल नसता तर बरं झालं असतं.

Similar questions