मेडेलिव्हच्या आवर्तसारणीचे तीन गुण व तीन दोष लिहा.
Answers
उत्तर :-
मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीचे गुण :-
1. गुणधर्मांप्रमाणे आवर्तसारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरूस्त
करण्यात आले. उदा. बेरिलिअमचे आधी ठरविलेले 14.09 हे अणुवस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त केले, व
बेरिलिअमला बोरॉनच्या आधीची जागा दिली.
2. मेंडेलीव्हने आवर्तसारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या. त्यापैकी तीन
अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यांवरून एका- बोरॉन, एका-ॲल्युनिअम व एका-सिलिकॉन अशी नावे
देऊन मेंडेलीव्हने त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असतील असे दर्शवले. इतकेच नव्हेतर त्यांच्या
गुणधर्मांचेही भाकित केले. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडिअम (Sc), गॅलिअम (Ga) व
जर्मेनिअम (Ge)अशी नावे देण्यात आली. या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलीव्हच्या भाकीताशी जुळणारे आढळले.
खालील तक्ता 2.4 पहा. या यशामुळे मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीच्या महत्त्वाविषयी सर्वांची खात्री पटली व
मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत लगेच स्वीकारली गेली.
3. मेंडेलीव्हच्या मूळ अावर्तसारणीत
राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती.
परंतु एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी
हेलिअम, निऑन, अरगॉन, इत्यादी
राजवायूंचा शोध लागल्यावर मेंडेलीव्हने मूळ
आवर्तसारणीला धक्का न लावता ‘शून्य गण’
निर्माण केला व त्यात राजवायू बरोबर बसले.
मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीचे दोष :-
1. कोबाल्ट (Co) व निकेल (Ni) या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल
मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत संदिग्धता होती.
2. मेंडेलीव्हने आवर्तसारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म
समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत जागा कशा प्रकारे द्यावयाची हे एक
मोठे आव्हान उभे राहिले.
3. वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही.
त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्येकिती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकित करणे मेंडेलीव्हच्या आवर्ती
नियमानुसार शक्य नव्हते. मूलद्रव्य (रेणूसूत्र) धातूंबरोबरील संयुगे अधातूंबरोबरील संयुगे .
4. हायड्रोजनचे स्थान : हायड्रोजन हा हॅलोजनांशी (गण
VII) साम्य दर्शवतो, जसे की हायड्रोजनचे रेणुसूत्र
H 2 आहे, तर फ्लुओरिन, क्लोरीन यांची रेणुसूत्रे
अनुक्रमे F2 , Cl2 अशी आहेत. तसेच हायड्रोजन व
अल्क धातू (गण I ) यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्येही
साधर्म्य आहे. हायड्रोजन व अल्क धातू (Na, K, इत्यादी. ) यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणुसूत्रांमध्ये साधर्म्य आहे. वरील गुणधर्मांचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्क धातूंच्या गणात (गण I) की हॅलोजनांच्या
गणात (गण VII) हे ठरवता येत नाही.
Answer:
I don't know:) :) :):):):):):):):):):)