माझा आवडता खेळ handball
निबंध मराठी
Answers
Answer: Here's your answer
Explanation:
एक सांघिक खेळ. हा जलदगतीचा आरोग्यदायी खेळ असून त्यात पळणे, उडी मारणे व फेकणे यामैदानी खेळातील तीनही मूलभूत क्रियांचा मिलाफ झाला आहे. त्यामुळेच हँडबॉलचा सामना प्रेक्षणीय असतो. त्यात खेळाडूच्या लवचिकतेची, पळण्याच्या कौशल्याची वयुक्तिबाजपणाची परीक्षा असते. हा खेळ फार प्राचीन असून रोमच्या भव्य स्नानगृहांतून तो पूर्वी खेळला जात असे. ? फुटबॉल, ? बास्केटबॉल व रग्बी फुटबॉल या खेळांशी हँडबॉलचे साम्य आहे. यात हाताचे कार्य प्रमुख असून अचूक फेकीला महत्त्व असते. शिताफीने चेंडू झेलून, क्षणार्धात निर्णय घेऊन, योग्य त्या भिडूकडे तो टाकण्यात आणि प्रतिपक्षाला हुलकावण्या देत गोल मारण्यात या खेळाचे सार आहे. जलद हालचालींतून सांघिक सामर्थ्य प्रकट करण्यावर संघाचे यश अवलंबून असते. कुठेही, केव्हाही व कोणीही – पुरुष, स्त्रिया व मुला-मुलींनी – खेळावा असा हा स्वस्त व कमीतकमी साधनांचा खेळ आहे.
इतिहास
हँडबॉलचा खेळ इंग्लंडमध्ये सोळाव्या शतकात प्रविष्ट झाला. आयर्लंडमध्ये १८५० च्या दशकात त्याचेसामने होऊ लागले. आयरिश लोकांनी तो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत नेला. त्यानंतर १८८७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आयरिश हँडबॉलपटू जॉन लॉलोर व अमेरिकन हँडबॉलपटू कॅसे बेगन यांच्यामध्ये स्पर्धा होऊन कॅसेने विजेतेपद मिळविले. १८९० च्या सुमारास जर्मन व्यायामशिक्षक कॉनरॅड कॉच यांनी हँडबॉल या खेळाची रचना आणि नियम विकसित केले. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे हिरस्चमॅन व क्रीडाशिक्षक कार्ल शेलेंझ यांनी हँडबॉलच्या प्रसाराला हातभार लावला. १९२० पर्यंत यूरोपमध्ये हा खेळ सर्वत्र मान्यता पावला.’ बॉलगेम्स ङ्खमधील हा सर्वांत धाकटा खेळ समजण्यात येतो. यूरोपात हा खेळ असोसिएशन फुटबॉलच्या नियमांनुसार खेळला जात असल्यामुळे फुटबॉलपासून तयार केलेला खेळ असेच त्याला संबोधले जाई. या खेळाची आंतरराष्ट्रीय नियमावली करण्यासाठी अॅमच्युअर अॅथलेटिक्स फेडरेशनने एक समिती नेमली (१९२६). या खेळाचे नियम केल्यावर १९२८ मध्ये ‘इंटरनॅशनल अॅमच्युअर हँडबॉल फेडरेशन’ ही संस्था अॅमस्टरडॅम येथे स्थापन करण्यात आली. १९३४ पर्यंत सु. २५ देशांनी हा खेळ स्वीकारला. १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेपासून हँडबॉल या खेळाचा ऑलिंपिक स्पर्धांत समावेश झाला. त्या वर्षी जर्मनीचा संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंडचे संघ अनुक्रमे दुसरे व तिसरे आले.११ जुलै १९४६ रोजी ‘इंटरनॅशनल हँडबॉल फेडरेशन ङ्ख( आय्एच्एफ्) ची स्थापना झाली. तिचे मुख्यालय बाझेल (स्वित्झर्लंड) येथे आहे. १९७२ मध्ये म्यूनिक ऑलिंपिकमध्ये पुरुष हँडबॉल खेळाचा, तर १९७६ मध्ये माँट्रिअल ऑलिंपिक स्पर्धेत महिला हँडबॉल खेळाचा समावेश करण्यात आला. सु. १६६ देशांनी आय्एच्एफ् या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे (२०१५). पुरुष हँडबॉल स्पर्धेत फ्रान्स (२००९; २०११) आणि स्पेन (२०१३) यांनी, तर महिला हँडबॉल स्पर्धेत रशिया (२००९) व नॉर्वे (२०११) यांनी जागतिक विजेतेपद पटकविले.