India Languages, asked by mukeshsinghrawat875, 10 months ago

माझा आवडता संत निबंध​

Answers

Answered by atharvrakshiye1906
7

Explanation:

जन्म : १२७५

मृत्यू :१२९६

हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्मअहमदनगर जिल्ह्यातीलपैठण जवळील आपेगांव येथे झाला. सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवर निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.ज्ञानेश्वरांनी भगवद्‍गीतेतील विचार-तत्त्वज्ञान सामान्य माणसांना कळावेत म्हणून ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानदेवी हा ग्रंथ मराठीत लिहिला. कृष्णाच्या अवस्थेचे ज्ञानेश्वरांनी नाट्यमय वर्णन केले आहे. तद्कालीन समाजाने त्यांचा अतिशय छळ करुनही त्या दुःखाचे दर्शन त्यांनी आपल्या लेखनात कुठेच घडविले नाही हे त्यांचे मोठेपण होय.

‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह – या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली

....

Answered by ItsShree44
2

Answer:

संतकवींनी रचलेल्या ओव्या अभंगांनी मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्यापासून ते संत नरहरी सोनार, संतbबंका, संत चोखा मेळा, संत सेना न्हावी अशी संतांची एक फार मोठी मालिकाच दाखवता येईल. या संतांनी मराठी साहित्य संपन्न केले आहे. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे या कवींबरोबर आपणांस संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत निर्मळा अशा कवयित्रीही भेटतात. स्वत:च्या मनातील उत्कट भक्तिभाव त्यांनी

अभंगरचनेतून व्यक्त केला आहे.

आपल्या संत जनाबाई या त्यांच्यापैकीच एक. त्यांचा जन्म केव्हा झाला l याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. कारण ही एक वाट चुकलेली लहान मुलगी संत नामदेवांच्या वडलांना जत्रेत सापडली. तिचे कुणीही पालक सापडले नाहीत म्हणून त्यांनी तिला आपल्या घरात सांभाळले. अशी एक आख्यायिका आहे. संत नामदेवांचे घर हे भक्तिरसात टुंबलेले असे. त्यांचे आईवटील, त्यांची पत्नी, चतः संत नामदेव विठ्ठलभक्तिपर अभंग रचत, या वातावरणात वाढणान्या जनाबाट परमेश्वरभक्त झाल्या नसत्या तरच नवल. कोठल्याही शाखेत, कधीही न गेलेल्या जनाबाई आपली भक्तिभावना काव्यात व्यक्त करू लागल्या. त्यांचे थोडेथोडके नव्हेत, तर सुमारे साडेतीनशे अभंग आज उपलब्ध आहेत.

संत जनाबाई नामदेवांना आपल्या गुरुस्थानी मानत असत, म्हणून प्रत्येक अभंगाच्या अखेरीस त्या आपला उल्लेख 'नामयाची दासी उनी' असा करतात. संत जनाबाईंनी आपल्या गुरुचे म्हणजे संत नामदेवांचे चरित्र अधांतून गायले आहे.

त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या अभंगांतून हरिश्चंद्राचे आयात गितले आहे. कृष्णजन्म, बालक्रीडा व काला यांचे त्यांनी रसभरित वर्णन केले आहे.

संत जनाबाईची परमेश्वरावर उत्कट भक्ती होती. त्यामुळे त्यांना प्रत्येक काम करताना परमेश्वर आपल्याला मदत करत आहे, असे वाटे, 'उनी केर काढते, तर चक्रपाणी केर भरतो. जनीचे जाते ओढण्यास भगवंत मदत करतो', असे त्या म्हणतात,

विठ्ठलाला भेटीसाठी त्या आर्ततेने विनवणी करतात. परमेश्वराप्रमाणे संत जनाबाईंच्या मनात संतांविषयी अतीव l आदर आहे. संतांचा गौरव गाताना त्या विविध रूपके योजतात. साखर व तिची गोडी वेगळी करता येत नाही, त्याप्रमाणे संत व भगवंत यांना परस्परांपासून वेगळे करता येणार नाही, असे त्या सांगतात, परमेश्वरावरील उत्कट भक्ती, शब्दांचा साधेपणा व मनाचा भोळा भाव हे संत जनाबाईंच्या रचनेचे विशेष आहेत.

Similar questions