माझे आवडते शिक्षक या विषयावर निबंध लिहा
Answers
माझे आवडते शिक्षक मा. दामले गुरूजी. आम्हांला पाचवीपासूनच गणित हा विषय शिकवायचे. मला गणित विषयात अजिबात रूची नव्हती. पण सरांनी खुप सोप्या सुत्रांमध्ये व वेगवेगळया खेळांद्वारे आम्हाला गणित विषय शिकविला. तेव्हापासून मला गणित विषय व दामले गुरूजी खूप आवडतात. मला घडविणारे, तसेच माझ्यावर भरभरून प्रेम करणारे, योग्य दिशा दाखविणारे, कधी काही चुकल्यास कान पकडणारे व शिक्षा करणारे तसेच व्यवस्थीत अभ्यास केल्यास भरभरून कौतूक करणारे आमचे दामले सर मला खूपच आवडतात. प्रत्येक विद्याथ्र्यांवर ते लक्ष देतात व त्यांच्या शिकवणीतून आम्हांला योग्य दिशा दाखवितात. माझ्या शिक्षकांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते.
■■ माझे आवडते शिक्षक ■■
शिक्षकांचे आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. शिक्षक आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी शिकवतात. अभ्यासाबरोबरच ते आपल्याला इतर गोष्टींबद्दल ज्ञान देतात.
तसे तर मला सगळेच शिक्षक आवडतात, पण माझी आवडती शिक्षिका आहे हर्षदा अय्यर. शाळेत ती माझी इंग्रजी शिक्षिका होती. दहावी इयत्तेत ती माझी वर्ग शिक्षिकाही होती.
दैनंदिन जीवनातील उदाहरण देऊन ती प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगायची. तिची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. ती अशा प्रकारे शिकवायची,की जणू पाठाचा संपूर्ण चित्र आमच्या डोळ्यांसमोर उभा राहायचा.
ती अतिशय विनम्र,साधी आणि हुशार होती. ती प्रत्येकाच्या शंकांचे उत्तर द्यायची. अभ्यासात हुशार असल्यामुळे, मी तिची लाडकी होती. कधीकधी मी तिला माझ्या वैयक्तिक समस्याही सांगायची. ती मला सामधानकारक उत्तरं द्यायची. तिने मला स्वतंत्र,आत्मविश्वासी आणि उदार व्हायला शिकवले. मी तिच्याकडून बरेच काही शिकले आणि म्हणूनच ती माझी आवडती शिक्षिका आहे.