Biology, asked by YASHRAJ27M, 11 months ago

ॲमेझोन नदीच्या जलप्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा​

Answers

Answered by varadad25
17

Answer:

अॅमेझॉन नदीच्या जलप्रणालीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत:-

Explanation:

१. अॅमेझॉन नदीचा उगम ब्राझील देशात होत नाही. या नदीचा उगम पेरू देशातील 'अँडीज' पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो.

२. अॅमेझॉन नदीला अनेक उपनद्या आहेत जसे की निग्रो, जापुरा, पुरुस, सिंगू इत्यादी.

३. अॅमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण खूप मोठे आहे. अॅमेझॉन नदीतून सुमारे २ लाख घनमीटर प्रति सेकंद एवढ्या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होतो.

४. अॅमेझॉन नदीतून होणाऱ्या या प्रचंड पाण्याच्या विसर्गाने नदीच्या पात्रातील जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो.

५. अॅमेझॉन नदीच्या मुखाकडील भागातही गाळाचे संचयन मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे अॅमेझॉन नदीच्या मुखाशी गाळाचे प्रदेश तयार होत नाहीत. तर तेथे बेटे तयार होतात.

६. अॅमेझॉन नदीच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक लहान - मोठी बेटे तयार झाली आहेत. उदा., माराजॉ बेट.

७. अॅमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे १५० किमी आहे. यामुळे अॅमेझॉन नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक केली जाते.

८. अॅमेझॉन नदीच्या जलप्रणालीमुळे ब्राझीलच्या पश्चिमउत्तर भागात मैदानी प्रदेश निर्माण झाला आहे.

Similar questions