माझे संविद्यान माझा अभिमान निंबध
Answers
संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो. असंख्य भाषा, जाती ,पंथ,धर्म असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता,न्याय ,समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वांतत्र्य,दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देणारे भारतीय संविधान दि.२६ नोव्हेंबर,१९४९ रोजी देशाला अर्पण करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत.संविधानातील मूलतत्त्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे याकरिता संविधानाची माहिती,संविधानातील मूलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मूलतत्वांविषयी जाणीवजागृती होणे अशा विविध उद्देशांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
I hope my answer is useful.