India Languages, asked by excellentTTD4824, 9 months ago

मी केलेला प्रवास मराठी निबंध

Answers

Answered by suraj62111
4

You are here: मुख्यपृष्ठ /माझा गोवा प्रवास.... खुद्द गोव्यात..

माझा गोवा प्रवास.... खुद्द गोव्यात..

Submitted by कौतुक शिरोडकर on 13 December, 2009 - 12:29

(प्रस्तावना - http://www.maayboli.com/node/12345

मांडवी एक्सप्रेस - http://www.maayboli.com/node/12423)

सावंतवाडी नंतर पेडणे. इंग्रजीत पेरनेम. 'ड' साठी 'डी' असताना बोबडेपणा करून तो 'आर' का वापरतात ते मला अजूनही माहीत नाही. (कदाचित एखादा 'मायबोलीकर' यावर प्रकाश टाकू शकेल.) या बोबडेपणामुळे साडीची 'सारी' होते. नशीब नाडीला 'नारी' म्हणत नाहीत ते. (या वाक्यावर नार्‍यांनी (नारीचे अनेकवचन) आक्षेप घेऊ नये ही विनंती.) पेडणे पुढे 'थिवी'. इंग्रजीत 'थिविम'. मराठी उच्चारही तसाच लिहीलेला. तसच पणजीच 'पणजीम'. बेतीच 'बेतीम'. बरं मराठीतला 'फोंडा' तर इंग्रजीत 'पोंडा'. स्थानांचे मराठी उच्चार आणि त्यांचे इंग्रजी स्पेलिंग हा तर एक वेगळाच विशय. पोर्तुगीज गेले, जाताना जसे 'म' चे शेपूट ठेवून गेले तसे त्यांनी त्या जागांचे केलेले इंग्रजी उच्चारही अजून तसेच. गोव्याने गरजेपुरतेच बदल स्वीकारलेत. बाकी सगळं काही जैसे थेच ठेवलय असं वाटतं कधी कधी.

थिविला उतरलो तेव्हा बर्‍यापैकी अंधारलं होतं. साधारण साडे सहा-सात वाजले होते. मडगावला उतरण्यापेक्षा पणजीला जाण्यासाठी थिविला उतरणे जास्त सोयिस्कर. स्टेशनच्या बाहेर आलो की साधारण पाच मिनिटाच्या अंतरावर बससर्विस आहे. पण लवाजमा घेऊन बसने जाण्यापेक्षा टॅक्सी किंवा रिक्षाने जाण्याचा ठराव एक विरुद्ध तीन असा पास झाला. प्रिपेड टॅक्सी पावणेचारशे तर रिक्षा अडीचशे.

"इतकं महाग ?" इति सौभाग्यवती.

"मग बसने जायच का ? " खिसा चाचपणारा मी. समोर तीन पडलेले चेहरे. तोवर 'पात्रांव' (शेठ) म्हणत रिक्षावाले पुढे आले.

"त्यांच्याशी कोकणीत बोल. बघ काही कमी करतात का ते ?" सौभाग्यवतीने तिच्या बारगेनिंगच्या कौशल्याचा वापर करण्याची कल्पना दिली. मुंबईत वा विरारमध्ये आजवर एकाही मराठी रिक्षावाल्याने मला मी मराठी असल्याने भाडं कमी केल नव्हतं की भाजीवाल्याने भावात फरक केला नव्हता. उलट एका रुपायासाठी पंधरा मिनिटे थांबवून नोट सुटी करून आणून दिल्याच्या आठवणी आहेत. एखाद्यावेळी मारवाडी वा भय्या भाजीवाला अठठावन रुपये झाले तर पच्चावन घेऊन आपल्या औंदार्याची झलक देतात. पण मराठी..... माझ्या कोकणी बोलण्याने माझं कोकणी भाषेच्या ज्ञानाचं वस्त्रहरण होईल याची मला खात्री होती. म्हणून मी ऐनवेळी तिचा सल्ला धुडकावण्याचं धाडसं केलं

it will definitely help u....

Answered by kumarsonu2
4

Answer:

please check the attached image,

Attachments:
Similar questions