मूक वाचन(correct one)
Answers
२.२.२ मूक वाचन
मूक वाचन म्हणजे मनातल्या मनात केलेले वाचन हे वाचन वाचक स्वतःसाठीच करीत असतो. अर्थग्रहणासाठी, आनंदासाठी, अभ्यासासाठी असे वाचन उपयुक्त ठरते. हे वाचन करताना ओठांच्या हालचाली, उच्चारणासाठी लागणारा वेळ व शक्ती खर्च होत नसते. शब्दांच्या उच्चारणाला जो वेळ लागतो तो येथे वाचतो. तसेच शब्दांचे उच्चारण करताना आघात, चढउतार यांकडे जेवढे जाणीवपूर्वके लक्ष द्यावे लागते तेवढे अशा वाचनात फारसे देण्याची गरज नसते. यामुळे उच्चारणाकडे लक्ष न वेधता ते आकलनाकडे अधिक वळविता येते. कोणताही बाह्य आवाज होत नसल्याने आवाजाचा अडथळा होत नाही. त्यामुळे एकाग्रता अधिक येते. अशा मूक वाचन कौशल्याचा उपयोग अभ्यासक, सामान्य वाचक, लेखक, संशोधक, शिक्षक, अशा ज्यांना खूप वाचावयाचे असते त्यांना होतो काही गोष्टी मोठ्याने वाचण्यापेक्षा मनात वाचूनच अधिक न्या कळतात. उदाहरणार्थ, कादंबरी, खाजगी पत्रे, वैचारिक लेखन, माहितीपूर्ण लेखन, इत्यादी.