India Languages, asked by redneckgal899, 1 year ago

मोर या पक्षीवर निबंध लिहा

Answers

Answered by janvimurade
5
first write that he is an our national bird then write his quality then special features then the thing which u mostly love about him then why u like the peacock
Answered by Mandar17
6

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. सर्व पक्ष्यांमध्ये मला मोर फार आवडतो. मोर हा आपल्या सुंदर पंखांमुळे सर्वांना मनमोहक वाटतो. भारतातील अनेक जंगलामध्ये आढळल्या जाणारे मोर विशेषतः मोरपंखी छटांचा व त्याच्या पिसार्यावर हिरव्या, निळया, सोनेरी रंगांच्या छटा असतात. काही ठिकाणी पांढऱ्या  रंगाचा मोर आढळतो. मोर हा पक्षी फारच मोहक दिसतो, त्याची उंच मान, पिसावरील ठिपके, लांब पाय व डोक्यावरील तुर्यामुळे मनमोहक अशी छटा सर्वांच्या मनात घर करते. मोर हा नरपक्षी असून सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतो. पावसाची चाहुल लागताच आपला पिसारा फुलवून मनसोक्त नृत्य करणारा पक्षी म्हणजेच मोर. मोर हे सरस्वती देवीचे तसेच कार्तीकेयचे वाहन आहे. भारतातील पुणे जिल्हयात मोराची चिंचोली गावात असंख्य मोर आढळतात. त्याच्या रूबाबदार शैलीमुळे सर्वांनाच मोर हा पक्षी अतिशय प्रिय वाटतो.

Similar questions