महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा.
Answers
Explanation:
महानगरपालिका’ या संज्ञेचा अर्थ म्हणजे मुंबई महानगरपालिका अद्ययावत अधिनियम १८८८ अंतर्गत गठीत बृहन्मुंबई महानगरपालिका. या रचनेमध्ये प्रभाग निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष निवडून आलेले २२७ नगरसेवक आणि ज्यांना महापालिका प्रशासनाशी निगडित विशेष माहिती आहे अथवा अनुभव धारण केलेला आहे, असेमहानगरपालिकेने नामनिर्देशित केलेले ५ नगरसेवक यांचा समावेश असतो (कलम ३ आणि ५). महानगरपालिकेचा कालावधी तिच्या पहिल्या सभेपासून ५ वर्षाचा असतो (कलम ६). नगरसेवकांचा कार्यकाल कालावधी हा महानगरपालिकेच्या कालावधीसम असेल. (कलम ६ अ). दि. १५ फेब्रुवारी २००७ चा शासन अध्यादेश क्रमांक बीएनएम.५००५/४६/ सी.आर.७/भाग-चार/नवि-३२ अन्वये सर्वसाधारण निवडणुकीनंतर महानगरपालिकेने त्यांच्या पहिल्या विशेष सभेत नगरसेवकांमधून एकाची महापौर आणि दुसऱयाची उपमहापौर म्हणून निवड करावयाची असते.
इतर प्रत्येक बाबतीत महापौर हे सभा निश्चित करतील, अथवा त्यांच्या अनुपस्थितीत उप महापौर किंवा अध्यक्ष, स्थायी समिती हे सभा निश्चित करतील.
महानगरपालिका विविध समितींचे सदस्य नामनिर्देशित करते जसे की, १) वैधानिक समिती, २) विशेष समिती, ३) सल्लागार समिती आणि ४) महानगरपालिकेच्या उप- समितींचे सदस्य.
महानगरपालिकेचे कामकाज
महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे कामकाजाकरिता महानगरपालिका एकत्र येते आणि आपल्या सभा भरवून अशा सभा निमंत्रित करणे, अशा सभांची सूचना, जागा आणि व्यवस्थापन तसेच त्या सभा तहकूब करणे याविषयी तसेच सर्वसाधारणपणे कलम ६६ अ अंतर्गत महानगरपालिकेचे कामकाज चालविण्याच्या आणि तिचे व्यवस्थापन करण्याच्या पध्दतीविषयी तिला योग्य वाटतील असे विनियम वेळोवळी करील (कलम ३६ अन्वये)-
प्रत्येक महिन्यात एक सर्वसाधारण सभा भरविण्यात येईल.
दि. १५ फेब्रुवारी २००७ चा शासन अध्यादेश क्रमांक बीएनएम.५००५/४६/ सी.आर.७/भाग-चार/नवि-३२ अन्वये, महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडणुकीकरीता, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या मार्च महिन्यात पहिली विशेष सभा घेण्यात येईल आणि अश्या सभेचा दिवस, वेळ आणि ठिकाण हे महानगरपालिका चिटणीस यांनी माजी महापौर आणि आयुक्त यांच्याशी सल्लामसलत करुन निश्चित केले पाहिजे.
प्रत्येक सभेच्या सुचनेमध्ये सभेचा दिवस, वेळ आणि सभेचे ठिकाण तसेच सभेमध्ये करावयाचे कामकाज यांचा तपशिल नमूद केला पाहिजे, याकरीता महानगरपालिका चिटणीसांनी स्थानिक वर्तमानपत्रांत जाहिरात द्यावी आणि सदस्यांना त्यांच्या निवासस्थान पत्त्यावर सहपत्रांसहित सभेची कार्यक्रमपत्रिका वितरीत करावी.महापौर अथवा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उप महापौर किंवा अध्यक्ष, स्थायी समिती यांना, एकूण नगरसेवक संख्येच्या एक षष्ठांशपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी स्वाक्षरीसह लेखी विनंती केल्यास महानगरपालिकेची विशेष सभा बोलावता येईल. (कलम ३६ (ड)).
महानगरपालिकेच्या सभेचे कामकाज चालविण्याकरिता, सभेपूर्वी, एकूण नगरसेवक संख्येच्या एक पंचमांश इतकी गणसंख्या आवश्यक असते. (कलम ३६ फ)
प्रत्येक सभेचे पीठासीन अधिकारी हे महापौर असतील, अथवा महापौरांच्या अनुपस्थितीत उप महापौर, आणि महापौर व उप महापौर हे दोघेही अनुपस्थित असतील तर सभेमध्ये उपस्थित असलेल्या नगरसेवकांमधून एकाची सभेने प्रासंगिक काळाकरिता पीठासीन अधिकारी म्हणून निवड करावी.
आयुक्तांना, अथवा आयुक्तांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, उप आयुक्त किंवा संचालक यांना महानगरपालिकेच्या सभेस उपस्थित राहण्याचा तसेच सभेत होणाऱया चर्चेत भाग घेण्याचा अधिकार आहे तथापि त्यांना अशा सभेत कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्याची किंवा प्रस्ताव करण्याची मुभा असणार नाही.
मुंबई महानगरपालिका अद्ययावत अधिनियम कलम १२७ अन्वये, मार्च महिन्याच्या १० तारखेला किंवा त्यापूर्वी
mark as brainlist
महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे
Explanation:
महानगरपालिका विविध समितींचे सदस्य नामनिर्देशित करते जसे की,
१) वैधानिक समिती,
२) विशेष समिती, ३) सल्लागार समिती आणि
४) महानगरपालिकेच्या उप- समितींचे सदस्य. प्रत्येक महिन्यात एक सर्वसाधारण सभा भरविण्यात येईल.
ज्या मोठ्या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते.
महानगरपालिकेला इंग्रजीत म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मध्य प्रदेश राज्यात नगर पालिका निगम आणि अन्य हिदी भाषक राज्यांत नगर निगम म्हणतात. महानगरपालिका या लांबलचक शब्दाऐवजी मराठीत या संस्थेचा उल्लेख महापालिका या सुटसुटीत नावाने होतो. इ.स. २०१६पर्यंत, महाराष्ट्रातील खालील शहरांत महानगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत