मराठी भाषेची कोणती वैशिपये पीने सांगितली आहेत?
Answers
Answered by
1
Answer:
- सुमारे ८ ते ८.५० कोटी लोक मराठी बोलतात.
- मराठी ही जगातील दहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. काही वर्षांपूर्वी ती १९ व्या स्थानी होती.
- भारतातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा तिसरा क्रमांक लागतो. हिंदी, व बंगाली या अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
- मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून महाराष्ट्र, दमण दीव आणि दादरा आणि नगर हवेली यांची अधिकृत तर गोव्याची दुसरी अधिकृत भाषा आहे.
- मराठी भाषेच्या अनेक उपबोली आहेत. त्यातील काही प्रमुख बोली : प्रमाण मराठी, अहिराणी, वऱ्हाडी, कोळी,मालवणी, चित्पावनी, दक्षिणी (तंजोर मराठी) इत्यादी.
- मूळ मराठी भाषा ही मोडी लिपीत लिहिली जात असे. आता मात्र ती बाळबोध (देवनागरी) लिपीत लिहिली जाते.
- भारतातील सर्वात प्राचीन वाङ्मयांपैकी काही मराठी भाषेत आहेत. इसवी सन ६०० च्या सुमारास हे वाङ्मयप्रकार लिहिले गेले असावेत.
- मराठी भाषा ही इंडो-युरोपियन भाषा कुटुंबातील इंडो-आर्यन या उपकुटुंबाची सदस्या आहे.
- अनेक इंडो-आर्यन भाषांमध्ये (जसे हिंदी) दोनच लिंगे मानली जातात. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. मात्र मराठी व्याकरणात नपुंसकलिंग सुद्धा आहे.
- मराठी भाषेची जुनी आवृत्ती, जिला महाराष्ट्री प्राकृत असे म्हणतात, तीत लिहिलेला शिलालेख जुन्नरजवळ नाणेघाटात सापडला. याचा काळ अंदाजे इसवीसन पूर्व तीनशे वर्षे असावा.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठीत रुजलेले पारिभाषिक शब्द काढून त्या जागी मराठी शब्द सुचवून मराठी भाषा समृद्ध केली. उदाहरणार्थ - तारीख (फार्सी) = दिनांक. मेयर (इंग्लिश)= महापौर.
- दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. मराठीतील थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा हा जन्मदिवस आहे.
Explanation:
Hope this helps you and pls mark me as brainliest
Similar questions