मराठी (Class 9)
मुख्याच्या आधारे गोष्ट लिहुन योग्य शीर्षक व तात्पर्य
एक शहर- एक व्यापारी--मोठा व्यापार--अनेक नोकर--गोका नोकरावर संशय-- शोध व तपास-- न्यायलयात जाणे -- न्यायाधीशास पेच--- युक्ती-- समान उंचीच्या काळ्या देणे-- चोराची काठी दोन बोटे कमी--- दुसऱ्या दिवशी न्यायालयात --- एक काठी दोन बोट लहान--- चोर पकडला जाणे-- मुद्देमाल परत मिळणेे--- तात्पर्य
Answers
Explanation:
Mc, xncn, xlxkx, cxx, d,d,c c,c,v v,v v v.vvv, vvk end date, xkcid
Answer:
एकदा एका व्यापाराकडे चोरी झाली. खूप शोध घ्यायचा प्रयत्न करूनही चोर काही सापडेनात. वैतागून तो व्यापारी आपल्या एका हुशार मित्राकडे गेला. त्या मित्राने सगळी हकीकत ऐकून घेतली. चोरीच्या घटनेवरून तरी ती माहितगार माणसाने केली असावी, हे पक्कं होत होतं.
मग व्यापाऱ्याच्या मित्राने त्याच्या सर्व नोकरांना बोलावणं पाठवलं. सगळे एकत्र आल्यावर त्याने प्रत्येकाच्या हातात एक काठी दिली. सर्व काठया एकाच मापाच्या होत्या. कोणतीही लहान किंवा मोठी नव्हती. सर्वांना काठी देऊन झाल्यानंतर मित्र म्हणाला की, 'ही काठी मंतरलेली आहे. एका महाराजांनी मला ती दिली आहे. आपण ही काठी घेऊन आपापल्या घरी जा. उद्या सगळे पुन्हा इथे या. सोबत काठी नक्की आणा. आणि हो, ही काठी मंतरलेली असल्याने जो चोर असेल त्याच्याकडची काठी आपोआप एक बोट लांब वाढेल. पण तुम्ही काळजी करू नका. जो चोर असेल, तो पाहून घेईल.' सगळ्या नोकरांत कुजबूज सुरु झाली.
त्यात खरा चोरही होताच. त्याने विचार केला, उद्या जर माझी काठी एक बोट मोठी झालेली दिसली तर व्यापारी मला आयतंच ओळखेल. तो मला पकडेल आणि शिक्षा करेल. त्यापेक्षा आजच मी काठीला एक बोटाएवढी कापून टाकतो. हा विचार करून त्याने काठी कापून तिला घासून आधीसारखं बनवलं आणि शांतचित्ताने झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे एकत्र आले. व्यापाऱ्याचा मित्र प्रत्येकाची काठी तपासू लागला. तेव्हा चोराची काठी नेमकी एक बोट कमी आढळली. त्याने त्याला ओळखलं. तो म्हणाला, ही काठी मंतरलेली नव्हतीच. मी केवळ एक युक्ती केली होती. आता आपली चूक कबुल करण्यावाचून चोराला पर्याय नव्हता. चोर पकडल्याने व्यापारीही खुश झाला.