India Languages, asked by sudhakarkamble809999, 4 months ago

मराठी निबंध
झाड बोलू लागले तर.....

Answers

Answered by shanicedsouza20
20
Answer


वृक्ष बोलू लागले......
सर्व्हे करायचा असेल तर खूप मजा वाटायची कारण नवनवीन माणसांची संबंध येणार आणि त्यामुळे माणसे ओळखायला शिकता येत असत...पण आज अशा गोष्टींचा सर्व्ह करण्याचा आहे की त्यांना समजून घेणे ही एक माझ्यासाठी एक परीक्षाच आहे....
पर्यावरणावर प्रेम असल्या मुळे मला वाटलं की चला आपण वृक्षांना काय वाटतंय हे जाणून घ्यावे.. म्हणून मी माझ्या परिसरातूनच सुरुवात केली...
मी वृक्षांना विचारले सांगा माझ्या सख्यानो तुम्हाला आता कास वाटतंय.....
काय सांगू मानवा? आज आमची परिस्थिती खूप वाईट होऊन गेली आहे तुम्ही मानव जात आमच्या देखत आमच्या बांधवांवर कुऱ्हाड चालवताय आणि त्याच्या रडण्याचा, चिखण्याचा आवाज आमच्या हृदयापर्यंत पोहचताय आणि एवढे दुःख होतंय की काय सांगू......
सखा मी समजू शकतो. अजून एक प्रश्न
आताचे तप्त वातावरणाचा तुमच्या जीवनावर काही परिणाम होतो का?
अरे मानवा ....तुम्ही आम्हाला तोडलं आणि त्याची झळ आम्हालाही सहन करावी लागते...एकवेळ तुमची संख्या कमी झाली तरी चालतील पण आमच्या संख्येने तुम्हा,पक्ष्यांना,प्राण्यांना आणि आम्हाला त्याच्या संकटांचा सामना करावा लागेल....पर्यायाने आपल्या पृथ्वी मातेचे नुकसान होईल...
उष्ण वातावरणामुळे अमच्यावरही परिणाम होत आहे आणि त्याच सोबत पाण्याची भीषण कमतरता आम्हाला जाणवतेय ..त्यामुळे आमचे काही स्नेही.छोटे बांधव यांना ही अत्यंत त्रास होतो...
आमचा त्रास कमी होईल जर तुम्ही मोठ्या प्रमाणात झाडे लावल्यावर
....
असे झाडांच्या प्रतिनिधीने कळकळणीने आणि आर्त भावनेने सांगितले त्याच्या सांगण्यातील भाव हृदयाला भिडत होत....
यानंतर मी शहरातील झाडांना काय वाटतंय ते जाणून घेण्यासाठी शहराच्या वाटेने गेलो....
शहरात झाडे ही चांगल्या रीतीने सजवलेलं होती पण सगळी कडे सिमेंट चे जंगल ....
खूप फिरलो आणि त्यांच्या प्रतिनिध्याला भेटलो आणि त्यालाही विचारलं...
तुमच्यात ,तुमच्या राहण्यात एक सुरेख देखावा आणि सोंदर्य दिसतंय..तर तुम्हला कस वाटतंय....
तो म्हणाला मान्य आहे की आमच्यात देखावा आहे पण तो आमच्या साठी नाही तर तो तुम्हा मानवांच्या साठी आहे ...
पण आमचा इथे दम घुटतोय...आम्हाला इथे श्वास ही नीट घेता येत नाही..
पहिला पाऊस कोणता आणि शेवटचा कोणता हेही कळत नाही...पहिल्या पाऊसच जो आमच्या धरणी मातेचा सुगंध असतो तो तर आम्ही विसरूनच गेलो आहे...सगळीकडे कँपन्यांचा धुरच धूर .....
आमचं जगणं मुश्किल झालं आहे....
अरे मानवा तुम्ही तुम्हची प्रगती करा पण आम्हाला ही जगू द्या जेव्हा तुम्ही अधुनिकरणासाठी आमच्या भावंड ,मित्र याना तोडता तेव्हा खूप दुःख आणि तुमचा राग येतो...
आम्ही उन्हात तुम्हाला सावली देतो,तुमच्या आजारांसाठी औषधे देतो..तुमच्या घरातील सुशोभिणीकरणासाठी काही लाकडं देतो...
तुमच्या अन्नासाठी आम्ही खत देतो आम्ही तुमच्यासाठी सर्वच देतो तर तुम्ही आमच्यासाठी काहीच का करू शकत नाही??..
आम्ही काय तुमच्याकडे काही मागत नाही फक्त एवढेच करा की वृक्ष रोपण करा....
आणि वृक्षाचे महत्व जनमानसात पोहचवा आणि झाडे लावण्यासाठी राजी करा...
झाडे असतील तर पर्यावरण चांगले राहील अन्यथा त्याचे दुष्परिणाम सर्वानाच भोगावे लागेल....
असे ऐकून मला मोठाच धक्काच बसला...
खरच जीवनच खरं वास्तव एका वृक्षा कडून ऐकायला मिळालं आणि हृदयात एक वेगळीच भावना तयार झाली....
आणि ठरवलं की झाडे लावण्यासाठी प्रबोधन तर करावंच पण प्रत्यक्षात सुद्धा त्यासाठी सुरुवात करावे...
विनंती आहे मित्रांनो झाडे लावा आणि वाढवा,जगवा....
एक आशेचा किरण
गौरव फौंडेशन...


Hope this helps you





Plz mark as brainliest
Similar questions