Hindi, asked by sohampatil7, 1 year ago

मराठी औपचरिक पत्राचा मायना​

Answers

Answered by ram3365
10

मराठी कट्टा

सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

पत्रलेखन

आज जग जवळ आले आहे. म्हणजे जगात दूरवर असलेल्यांना एकमेकांशी संपर्क साधण्याचे विविध मार्ग आज उपलब्ध आहेत.

उदा. दूरध्वनी, संगणक, इंटरनेट इत्यादी. तरीपण आजही माणसे एकमेकांना पत्रे लिहीत असतात. पत्राच्या माध्यमातून आपण आपले मन दुसऱ्याजवळ व्यक्त करू शकतो. म्हणून पत्रलेखन आजही अपरिहार्य आहे.

पत्राचे मुख्य २ प्रकार :

१) कौटुंबिक / घरगुती पत्र २) व्यावसा

ते पुढील प्रमाणे -

१) कौटुंबिक / घरगुती पत्रे

काही गोष्टी लक्षात घ्यावात -

- पत्राच्या वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात पत्रलेखकाचे नाव, पत्ता, तारीख घालावी.

- पत्र कोणत्या व्यक्तीला लिहीत आहोत, हे लक्षात घेऊन मायना लिहावा.

- पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत.

- पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा. आईवडिलांना 'शिरसाष्टांग नमस्कार' किंवा 'शि.सा. नमस्कार' आणि कुटुंबातील इतरांना सा.न. / साष्टांग नमस्कार / नमस्कार / आशीर्वाद यांपैकी योग्य ते शब्द लिहावेत.

- समारोपाचा योग्य मायना असावा.

- पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी.

२) व्यावसायिक पत्र

- व्यावसायिक पत्रात, पत्राच्या वरच्या भागात '।।श्री।।' वगैरे शुभदर्शक काहीही लिहिण्याची गरज नाही.

- पत्राची सुरुवात करताना वरती उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिण्यापूर्वी आपले पूर्ण नाव लिहावे. त्याखाली पूर्ण पत्ता पिनकोडसहित लिहावा.

- पत्र ज्याला लिहायचे आहे त्याचे नाव आणि संबंध लक्षात घेऊन मायना लिहावा.

- त्याखाली पत्राचा विषय व काही संदर्भ असल्यास तोसुद्धा लिहावा.

- योग्य, नेटक्या शब्दांत मजकूर लिहावा. परिच्छेद पाडावेत. पाल्हाळ असू नये.

- 'आपला विश्वासू' 'आपला कृपाभिलाषी' या शब्दांनी शेवट करून स्वाक्षरी करावी.

नमुना (कौटुंबिक)

तुमच्या शाळेत साजऱ्या झालेल्या स्वातंत्र्यदिनाची हकिकत आईला पत्र लिहून कळवा -

यज्ञेश राजेश कोलते

बाल शिवाजी विद्यालय,

राउत वाडी, उत्सव कार्यालय,

जिल्हा - अकोला

दि. २-२-२०१५

प्रिय आईस,

शिरसाष्टांग नमस्कार,

तुझे पत्र मिळाले. आता मी या शाळेत चांगलाच रुळलो आहे. मला आता ही शाळा खूप आवडू लागली आहे.

नुकताच पंधरा ऑगस्टला शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा झाला. गेल्याच आठवड्यात स्वतंत्रदिनाच्या निमित्ताने काही स्पर्धा झाल्या होत्या. त्यातील 'समर-गीत' गायन स्पर्धेत मी 'जिंकू किंवा मारू' हे गीत म्हटले. मला तिसरे बक्षीस मिळाले. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी आठ वाजता नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यांनी या स्वतंत्र देशासाठी विद्यार्थी काय करू शकतील, याचे उत्तम मार्गदर्शन केले. सामुहिक समर-गीत गायन खूप छान झाले. पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमच खूप छान झाला.

चिरंजीव रियाचा अभ्यास कसा चालला आहे?

ती. बाबांना शि.सा. नमस्कार. चि. रियाला अनेक आशीर्वाद.

तुझा,

राजू

नमुना (व्यावसायिक)शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेतील शिक्षकांनी उत्कृष्ट तयारी करून घेतली, म्हणून कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने लिहा.

राजेश कोलते

खेडकर नगर,

गणपती मंदिराजवळ

जिल्हा - अकोला

दि. २-२-२०१५

माननीय मुख्याध्यापक,

मुक्ताई माध्यमिक प्रशाला,

आळंदी (देवाची), पुणे - ४१२ १०५

विषय : परीक्षेसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.

महोदय,

सादर प्रणाम.

परवा १८ फेब्रुवारीला आमची सातवीची माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा झाली. आपल्या शाळेतून आम्ही वीस विद्यार्थी बसलो आहोत. या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी हे पत्र लिहीत आहे.

सर, आम्हांला सर्वांना पेपर्स अतिशय चांगले गेले. आम्ही दिलेल्या वेळांत सर्व प्रश्न सोडवू शकलो. याचे श्रेय आम्हांला शिकवणाऱ्या गुरुजनांकडे जाते. श्री. देसाई सर, श्री. महाले सर व सौ. नाचणेबाईंनी आमची खूपच चांगली तयारी करून घेतली होती. त्याबद्दल आम्ही सर्वजण कृतज्ञ आहोत. आपले आभार मानून पत्र पूर्ण करतो.

तसदीबद्दल क्षमस्व.

आपला नम्र विद्यार्थी,

राजेश कोलते

at ८:०० म.उ.

शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मुख्यपृष्ठ

वेब आवृत्ती पहा

Blogger द्वारा समर्थित.


sohampatil7: मला गुगल वरील उत्तर नको आहे
Answered by AditiNigade7755
1

Answer:

आदरणीय

Explanation:

पत्रामध्ये औपचारिक मध्ये आदरणीय लिहितात

धन्यवाद

please mark me as brainliest

Similar questions